शेतशिवारात मगरीचे रेस्क्‍यू ऑपरेशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : सीटीपीएस-खैरगाव शेतशिवारात रविवारी (ता. 4) पुराच्या पाण्यात आलेल्या मगरीला रेस्क्‍यू करून वनविभाग व इको-प्रोच्या चमूने सुरक्षित स्थळी सोडले. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

चंद्रपूर : सीटीपीएस-खैरगाव शेतशिवारात रविवारी (ता. 4) पुराच्या पाण्यात आलेल्या मगरीला रेस्क्‍यू करून वनविभाग व इको-प्रोच्या चमूने सुरक्षित स्थळी सोडले. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
संततधार पावसाने नद्या दुथळी भरून वाहत आहे. इरई धरणही भरले असून, सातही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे धरणलगतच्या गावांच्या शेतशिवारात पाणी भरले आहे. या पाण्यासोबत एक 5 फुट लांब मगर खैरगावच्या शेतशिवारात आली. पाणी ओसरल्यानंतर शेतात आलेली मगर गावकऱ्यांना दिसले. याची माहिती वनविभाग आणि इको-प्रोला देण्यात आली. वनविभागाचे मिलिंद किटे, बेग, इको-प्रोचे सुमित कोहळे यांनी रेस्क्‍यू काम सुरू केले. मगरीस जाळीत घेण्यात यश आले. नागरिकांची प्रचंड गर्दी आणि आरडा-ओरड सुरू असल्याने रेस्क्‍यू ऑपरेशनमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. मगर जाळीतून सुटकेचा प्रयत्न करीत होती. इको-प्रोचे बंडू धोतरे, मानद वन्यजीव रक्षकसुद्धा घटनास्थळी पोहोचले. यानंतर नागरिकांना शांत करीत सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले. जाळीत आलेल्या मगरीचे आधी तोंड बांधून व्यवस्थितरीत्या रेस्क्‍यू करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rescue operation of crocodile in the farm