कोणाच्या गळ्यात पडणार सरपंच पदाची माळ? दोन फेब्रुवारीला आरक्षण सोडत

चेतन देशमुख
Friday, 22 January 2021

जिल्ह्यातील एक हजार 201 ग्रामपंचायतींचे आरक्षण ग्रामपंचात निवडणूक विभागाने यापूर्वी काढले होते. निवडणुकीपूर्वी शासनाने सर्व आरक्षण रद्द केले. निवडणुकीनंतर नव्याने आरक्षण सोडत काढले जाणार असल्याचे जाहीर केले.

यवतमाळ : नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता सरपंच आरक्षण कधी निघणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. त्यांची प्रतीक्षाही संपली असून, येत्या दोन फेब्रवारीला जिल्ह्यातील 16ही तालुक्‍यांत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर चार फेब्रवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आरक्षण काढण्यात येणार आहे.  

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

जिल्ह्यातील एक हजार 201 ग्रामपंचायतींचे आरक्षण ग्रामपंचात निवडणूक विभागाने यापूर्वी काढले होते. निवडणुकीपूर्वी शासनाने सर्व आरक्षण रद्द केले. निवडणुकीनंतर नव्याने आरक्षण सोडत काढले जाणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पहिल्यांदा आरक्षण सोडतीत आरक्षित झालेल्या जागांसाठी अनेक जण संरपचपदाचे बाशिंग बांधून होते. जिल्ह्यात नुकतेच 980 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक संपली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागलेल्या आहेत. जिल्ह्यातील एक हजार 201 ग्रामपंचायतींचे आरक्षण नव्याने काढले जाणार आहे. त्यासाठी दोन फेब्रुवारीचा मुहूर्त ठरला आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्‍यांत दोन फेब्रवारीला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. याठिकाणी एस सी, एसटी, नागरिकांचा मागासप्रवर्ग पदाची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर आरक्षित जागेतील महिला आरक्षणाची सोडत चार फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात काढली जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. आपल्या प्रवर्गाचे आरक्षण यावे, यासाठी सर्वांनीच देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळे नवीन आरक्षण सोडतीत कोणते बदल होणार, याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. जिल्ह्यातील बारोश ग्रामपंचायतींमधील 50 टक्के पद हे महिलासाठी आरक्षित असणार आहेत. त्यामुळे कोणत्या गावांची चाबी महिलेच्या हाती जाणार, यावर चार फेब्रुवारीला शिकामोर्तब होणार आहे.

हेही वाचा - अन् पराभूत उमेदवार झाला विजयी; ३ दिवसांच्या आंनदोत्सवावर विरजण; नक्की काय घडला प्रकार 

157 गावांत 'एसटी सरपंच' -
जिल्ह्यातील 157 ग्रामपंचायती 'पेसा'अंतर्गत आहेत. या ठिकाणचे सरपंचपदांचे आरक्षण हे 'एसटी' या प्रवर्गासाठी कायम राखीव आहे. प्रत्येक निवडणुकीत महिला किंवा पुरुष एवढीच सोडत या ठिकाणी आहे. त्यामुळे या भागात केवळ महिला व पुरुषऐवढीच सोडत काढली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reservation for sarpanch on 2 february in yavatmal