तिवसा नगरपंचायत निवडणूकीचे प्रभागाचे आरक्षण जाहीर; विद्यमान सदस्यांना बदलावे लागणार प्रभाग

Reservations for tivasa gram panchayat election is declared
Reservations for tivasa gram panchayat election is declared
Updated on: 

तिवसा (जि. अमरावती) : तिवसा नगर पंचायत कार्यकाळ संपण्याचा कालावधी केवळ 29 नोव्हेबर रोजी पर्यन्त बाकी आहे, या नगरपंचायतचे सार्वत्रिक निवडणूकी कडे नगर वासीयांचे  डोहळे लागले असून  प्रभागातील आरक्षण  सोडत आज  दुपारी 11 वाजता तिवसा तहसीलच्या प्रशासकीय भवनात काढण्यात आले 
 
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक  नरेंद्र फुलझेले,तहसीलदार वैभव फरतारे मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांच्या उपस्थिती पार पडली. मागील  2015 मध्ये राखीव आरक्षीत  प्रभागाचे आरक्षण वगळून चक्राणू पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले

तर नागरिकांचे मागास  प्रवर्ग सर्वसाधारण प्रवर्ग व अनुसूचित महिला यासाठी चिठी पध्दतीने महिलांचे आरक्षण काढण्यात आले आहे ओम प्रमोद वानखडे यां मुलांचे हस्ते चिठ्या काडून ते जाहीर करण्यात आले अनेक माजी नगरसेवक यांचे प्रभागात स्त्री राखीव तर  काही प्रभागात राखीव तर राखीव प्रभागात मागासवर्गीय आरक्षण निघाल्यामुळे अनेकांची गोची झाली असून अनेकांमध्ये काही गम तर काही खुशी पाहायला मिळाली आहे. 

या सोडत च्या आरक्षनामुळे अनेकांना आपले बल्लेकिल्ले सोडावे लागणार 17  प्रभागाचे आरक्षणा मध्ये  7 सर्वसाधारण जागा, 4 अनुसूचित जाती, 1 अनु जमाती, 5  मागास प्रवर्ग  साठी असून यापैकी 9 जागा  महिलांकरिता  राखीव आहेत

तिवसा नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये विविध पक्ष मैदानात उतरून आपले तगडे उमेदवार देणार याची चर्चा शहरात रंगू लागली आहे, तिवसा वासियांनी 2015 ला काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता देत बदल घडविला या वर्षी काँग्रेसने केलेल्या विकास कामाच्या जोरावर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल का अशी चर्चा शहरात जोर धरत आहे. त्यामुळे नगरपंचायतच्यात निवडणूकि कडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Open drains and stagnant wastewater raise sanitation concerns at Gadchiroli District General Hospital.
Gurudev Seva Mandal Clarification
Devotees gather at Gurukunj Mozari during the 58th death anniversary event of Rashtrasant Tukdoji Maharaj.
Sant Tukdoji Maharaj