निवासी डॉक्‍टरनेच रुग्णाला खोलीत कोंडले!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नागपूर - सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी कॅज्युअल्टीत महिलेच्या मृत्यूने झालेल्या गोंधळाचे प्रकरण ताजे असताना पुन्हा मंगळवारी शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक साहित्य पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याने रुग्ण संतप्त झाला. यामुळे निवासी वैद्यकीय महिला अधिकाऱ्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर चक्क ‘रुग्णाला’ खोलीत कोंडून ठेवले असल्याचा आरोप नातेवाइकांनी केली. नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातला असल्याने सक्करदरा पोलिस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोचला. पोलिसांच्या मध्यस्थीने या प्रकरणावर दोन तासांनंतर पडदा पडला. मात्र, पोलिस शिपाई दिवसभर येथे तैनात होता.

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, बुटीबोरी परिसरातील कंपनीत कार्यरत एका रुग्णाला ‘हिप रिप्लेसमेंट’ची गरज आहे. त्यानुसार उपचार व्हावे यासाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना चौधरी यांच्याकडे रुग्णासहित बुटीबोरी कंपनीतील कामगार गेले. परंतु, राज्य शासनाने औषधी, सर्जिकल साहित्य, वैद्यकीय उपकरणांची खरेदी  हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स्‌ कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फतच करणे बंधनकारक करण्यात आले यामुळे सध्या साहित्य उपलब्ध नसल्याने ‘हिप रिप्लेसमेंट’ करण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे रुग्ण तसेच नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी  येथेच व्हिडिओ काढण्यास तसेच गोंधळ करण्यास सुरुवात केली. यामुळे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी यांनी तत्काळ खोलीतून बाहेर येत खोलीला कुलूप ठोकले. यावेळी रुग्ण व दोन तीन नातेवाईक खोलीत राहिले. पोलिसांचा ताफा पोहोचताच नातेवाईक आणि कर्मचारी आमनेसामने आले. मात्र, कोणीही एकमेकांचे ऐकून घेण्यास तयार नव्हते. 

कामगारांच्या वेतनातून कपात 
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णसेवा मिळावी, यासाठी हे कामगार रुग्णालय स्थापन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ४.७५ टक्के, तसेच कंपनीकडून १.७५ रक्कम कपात केली जाते. यातून राज्य कामगार विमा आयुक्तालयात कोट्यवधींचा निधी शासनाच्या तिजोरीत जमा करते. यामुळे कामगारांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविणे ही जबाबदारी आहे, मात्र रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असल्यानेच अशा घटना घडतात, असे कामगारांचे म्हणणे आहे. 

राज्य शासनाने औषधांसह सर्जिकल साहित्य खरेदीचे अधिकार रुग्णालय प्रशासनाकडून काढून  घेत ते हापकिनकडे दिले. यामुळे हिप रिप्लेसमेंटसाठी आवश्‍यक साहित्य खरेदी करता येत नाही. हे समजावून सांगत असताना रुग्णासोबतच्या एका नातेवाईकाने गोंधळ घातला आणि  मोबाईलवरून व्हिडिओ घेत असल्यामुळे निवासी वैद्यकीय अधिकारी घाबरल्या. खोलीतून बाहेर येत दार लावले. दरम्यान या नातेवाइकांनी धमकी दिली आहे. पोलिसांकडून संरक्षण मिळावे. 

-डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक,  राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, नागूपर.

Web Title: The resident doctor stabbed the patient in the room