मेडिकलमध्ये रंगतात पेगचे पेच 

मेडिकलमध्ये रंगतात पेगचे पेच 

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांची संख्या साडेचारशेवर आहे. निवासी डॉक्‍टर 24 तास रुग्णसेवेच्या कर्तव्यावर असतात. निवासी डॉक्‍टरांच्या निवासाची सोय मेडिकल उपलब्ध करून देते. मात्र, काही निवासी डॉक्‍टर वसतिगृहातील खोल्यांचा वापरच करीत नाही. उलटपक्षी या खोल्यांचा पार्ट्या रंगवण्यासाठी वापर होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. 

वसतिगृहात रंगलेल्या या पार्ट्यांचा असह्य त्रास प्रामाणिकपणे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांना होतो. यामुळे काही निवासी डॉक्‍टरांनी सोमवारी अधिष्ठाता कार्यालयात आपली व्यथा मांडली. वसतिगृहात खोली मिळालेल्यांमध्ये काही स्थानिक निवासी डॉक्‍टरांचा समावेश आहे. यांच्या दहा ते पंधरा खोल्यांमध्ये राहात असलेले निवासी डॉक्‍टर या खोल्यांमध्ये दिसत नाही. खोल्यांना टाळे लावून ठेवले आहेत. दर आठ ते पंधरा दिवसांनंतर केवळ पार्टीसाठी या खोल्यांचा वापर करण्यात येत असल्याचे निवेदनात आहे. वसतिगृहात राहात असलेल्या अन्य डॉक्‍टरांना त्रास होत असल्याने ही माहिती उघडकीस आली. त्रस्त निवासी डॉक्‍टरांनी "मार्ड'कडेही तक्रार केली. मात्र, हे डॉक्‍टर मार्डलाही जुमानत नसल्यानेच अखेर त्रस्त निवासी डॉक्‍टरांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. 

अधिष्ठातांनी दिल्या कारणे दाखवा नोटीस 
अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे निवासी डॉक्‍टरांचे शिष्टमंडळ येतात, त्यांनी तडकाफडकी वसतिगृहाचा गैरवापर करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांच्या विरोधात आदेश जारी केला. निवासी डॉक्‍टरांना कमी पडत असलेल्या खोल्यांचा विचार करता स्थानिक डॉक्‍टरांना खोल्यांचा वापर करायचा नसेल तर त्या खोली खाली करून द्यावे असेही सुचविले. गैरवापर करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांना कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याची माहिती पुढे आली. 

खोलीचा गैरवापर करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांना नोटीस दिली आहे. दोन दिवसांत स्पष्टीकरण मागवले आहे. स्पष्टीकरण न दिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com