अमरावतीत हवा अनावश्‍यक गर्दीवर अंकुश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : अनलॉकमध्ये महापालिकेतील वाढती गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आव्हान आयुक्तांसमोर उभे ठाकले आहे. महानगरातील कोरोना संक्रमण वाढतच असल्याने व मनपातील दोन कर्मचारी संक्रमित आढळल्याने प्रशासकीय इमारतीचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार बंद करावे व गरजूंनाच प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी समोर आली आहे.


लॉकडाउन असताना महापालिकेचे दोन्ही प्रवेशद्वार ंबंद करण्यात आले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यल्प होती. अनलॉकमध्ये ही संख्या वाढली. यासोबतच दोन्ही प्रवेशद्वार जनसामान्यांसाठीही उघडण्यात आले. प्रवेशद्वार उघडताच नागरिकांचे आवागमन मोठ्या प्रमाणात वाढले. बाजारपेठेत येणारे नागरिकही आपली वाहने महापालिकेच्या आवारात पार्क करून खरेदीसाठी बिनधास्त जातात. सेवानिवृत्त कर्मचारी तासन्‌तास तळ ठोकून राहतात. निवेदनांचा ओघ वाढला असून घोळक्‍याने येणारे सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. कोण कोणत्या भागातून येत आहे याचा पत्ता लागत नाही. यामध्ये संक्रमित व्यक्ती असण्याची शक्‍यता आहे.

नागरी संस्था असल्याने नागरिकांचा प्रवेश बंद करता येत नसल्याचे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांचे म्हणणे आहे. मात्र गरजूनांच प्रवेश दिल्या जावा, मोजक्‍या संख्येनेच निवदेनकर्त्यांना येऊ द्यावे, मनपाच्या आवारात बाजारपेठेत जाणाऱ्यांच्या वाहनांना प्रवेश मनाई करावी, अशी मागणी समोर आली आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत कार्यरत दोन कर्मचारी संक्रमित आढळल्याने बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश मनाई करण्याची मागणी असली तरी आयुक्त यावर काय निर्णय घेतात, यावर बरेच काही अवंलबून आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com