Digital Arrest Scam: निवृत्त अभियंत्याला २३ लाखांनी गंडा; ‘डिजिटल अरेस्ट’ची दिली धमकी, सायबर पोलिसांकडून अटक
Cyber Fraud: ७५ वर्षीय निवृत्त मुख्य अभियंत्याला ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत २३.७१ लाख रुपयांनी लुबाडण्यात आले. सायबर पोलिसांनी ओडिशातून ६० वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
नागपूर : वेकोलिच्या ७५ वर्षीय निवृत्त मुख्य अभियंत्याला ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन २३ लाख ७१ हजार रुपयांनी गंडविल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केल्यावर, रेल्वेतील ६० वर्षीय कर्मचाऱ्याला अटक केली.