
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : बालवयापासून गणेशभक्तीचे वेड असलेल्या एका गणेशभक्ताने बालवयातील मनोदय सेवानिवृत्तीनंतर साकारला आहे. अमरावती येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधून वरिष्ठ अधिव्याखाता पदावरून सेवानिवृत्त झालेले प्रशांत डवरे यांनी सहचारिणीसह ३१ दिवसांत ४७४ किमीची पायी वारी करीत बालपणीचे स्वप्न सेवानिवृत्तीनंतर साकारत गणेशाला अनोखे वंदन केले आहे.