क्रांतीने परिवर्तन नव्हे तर केवळ गोंधळ होतो

क्रांतीने परिवर्तन नव्हे तर केवळ गोंधळ होतो

नागपूर : कुठलेही परिवर्तन एकदम होत नसते. त्यासाठी सातत्याने काम करावे लागते. काही जण क्रांतीची भाषा करतात, पण क्रांतीने परिवर्तन नव्हे तर गोंधळच अधिक होतो. परिवर्तन केवळ उत्क्रांतीनेच शक्‍य आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले.
लघु उद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाला रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी मंचावर लघु भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष जितेंद्र गुप्त व महाराष्ट्र प्रदेश रविंद्र वैद्य उपस्थित होते.
सरसंघचालक म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर देश सुरक्षित राहावा म्हणून संविधान तयार झाले. संविधानाने राजनैतिक व आर्थिक स्वातंत्र्य दिले. मात्र सामाजिक स्वातंत्र्य आपल्या प्रत्येकाच्या आचरणातून मिळणार आहे. त्यासाठी वैचारिक परिवर्तन गरजचे आहे. जगात 23 ते 24 कुटुंबांकडेच संपत्ती केंद्रित झाली असल्याने प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले नाही. देशात उद्योग, व्यापार आणि शेतीचा सार्वत्रिक विचार गरजेचा आहे. लघु, मध्यम, क्षुष्म आणि कारागिरीक्षेत्र बळकट व्हावे. लघु उद्योगांसाठी आवश्‍यक वातावरण व्हावे. त्यासाठी उद्योजकांच्या समस्या समजावून घ्या आणि गरज भासल्यास जनजागृतीच्या मार्गाने संघर्ष करावा.
अधिवेशनाला संपूर्ण देशातून सुमारे पंधराशेहून अधिक सदस्य आले आहेत. प्रास्ताविक जितेंद्र गुप्त यांनी केले. संचालन गोविंद लेले यांनी केले. आभार रविंद्र वैद्य यांनी मानले.
डॉ. आंबेडकर व डॉ. हेगडेवार यांचे मत एकच
1920 साली नागपुरात कॉंग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेगडेवार यांनी दोन प्रस्ताव मांडले होते. त्यातील एक भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचा होता. दुसरा आर्थिक सक्षमिकरणाचा होता. स्वातंत्र्याच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आर्थिक स्वातंत्र्याची परिभाषा सांगितली. सखोल विचार केल्यास दोघांचे मत एकच असल्याचे डॉ. भागवत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com