esakal | दुर्दैवी! पावसात भिजले हजारो क्‍विंटल धान; गोदाम हाऊसफुल्ल; लाखो रुपयांचे नुकसान

बोलून बातमी शोधा

rice crops damaged due to heavy rain in chandrapur

जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यामार्फत सेवा सहकारी सोसायटीतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखरेखअंतर्गत व्याहाड खुर्द येथील सोसायटीच्या परिसरात जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 20 हजार 625.95 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

दुर्दैवी! पावसात भिजले हजारो क्‍विंटल धान; गोदाम हाऊसफुल्ल; लाखो रुपयांचे नुकसान
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) :  जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसात व्याहाड खुर्द येथील सोसायटीच्या आवारात ठेवण्यात आलेले हजारो क्‍विंटल धान भिजले. गोदामात जागा नसल्याने गेल्या काही दिवसांपासून धानाचे पोते सोसायटीच्या आवारातच ठेवण्यात आले होते. अवकाळी पावसात धान भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यामार्फत सेवा सहकारी सोसायटीतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखरेखअंतर्गत व्याहाड खुर्द येथील सोसायटीच्या परिसरात जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 20 हजार 625.95 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. सावली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील एकूण 978 शेतकऱ्यांनी धान विक्रीकरिता टोकन स्वीकृत केले. 31 मार्च 2021 पर्यंत 658 शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर मालाची प्रत्यक्ष विक्री केली. 

सोयाबीनची वाटचाल सात हजारांकडे; लाभ मात्र व्यापाऱ्यांनाच, शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच

सेवा सहकारी सोसायटीला धान खरेदी केंद्र म्हणून नेमण्यात आले, तर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत धान खरेदी करण्यात यावे असे ठरविण्यात आले. खरेदी केलेल्या धानाची साठवणूक करण्याची जबाबदारी सेवा सहकारी संस्थेची आहे. त्यांच्याकडे दोन गोदाम आहे. त्यातील एका शासकीय गोदामात माल साठवून ठेवला. 

त्यानंतर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा धान खरेदी करण्यात आली. हे धान उघड्यावर पडून होते. ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची होती. मात्र, धान सुरक्षित ठेवण्यात आले नाही. शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. याच पावसात धान भिजले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

अपहरण, अत्याचारानंतर दुचाकीवरून ढकलले; महिलेसह दोन वर्षीय मुलगा गंभीर

सोसायटीतर्फे काही धान्य गोदामात ठेवले. गोदाम भरल्याने काही धान बाहेर ठेवण्यात आले.त्यावर शक्‍य झाले तितके ताडपत्री झाकून ठेवण्यात आली. शासकीय यंत्रणेने सहकार्य न केल्याने धान उघड्यावर होते. ते पावसात भिजले. त्यात आमची काही चूक नाही.
दीपक जवादे,
अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी व्याहाड खुर्द.

संपादन - अथर्व महांकाळ