मायलोमा आजाराने किडनी विकाराचा धोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नागपूर : मायलोमा हा रक्ताशी संबंधित आजार आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरात रक्‍ताची कमतरता निर्माण होते. प्लेटलेट्‌सच्या संख्येत झपाट्याने घट होते. हाडे दुर्बल होतात. अनैसर्गिकपणे प्रथिनांची शरीरात भरमसाठ वाढ होते. किडनी निकामी होण्याचा धोका असतो. अशावेळी रक्तविकारतज्ज्ञ (हेमॅटोलॉजिस्ट) व मूत्रपिंड विकारतज्ज्ञ (नेफ्रोलॉजिस्ट) यांनी संयुक्त उपचार केले तर मायलोमाच्या निदानानंतरही किडनी वाचवता येते, अशी माहिती मुंबई हॉस्पिटलमधील हेमॅटोलॉजी विभागप्रमुख डॉ. एम. बी. अग्रवाल यांनी दिली.

रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे रविवारी आयोजित किडनी विकारतज्ज्ञांची संघटना असलेल्या दी नेफ्रोलॉजी सोसायटीच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अश्विनीकुमार खांडेकर अध्यक्ष म्हणून तर डॉ. निशांत देशपांडे यांनी सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी ग्लेन ईगल्स ग्लोबल हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे संचालक डॉ. भरत शाह, मावळते अध्यक्ष डॉ. समीर चौबे, सचिव डॉ. मनीष बलवानी, हेमॅटोलॉजी-ऑन्कोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम काणे, सचिव डॉ. अवतारकृष्ण गंजू उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. सूर्यश्री पांडे (निर्वाचित अध्यक्ष), डॉ. अमित पसारी, डॉ. मनीष बलवानी (उपाध्यक्ष), डॉ. विशाल रामटेके (सहसचिव), डॉ. रितेश बनोदे (कोषाध्यक्ष), कार्यकारिणी सदस्य डॉ. विशाल वढेरा, डॉ. शैलेश गोंडाणे, डॉ. प्रवाश चौधरी, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. निखिल बडनेरकर, डॉ. प्रवीण पंत, डॉ. वंदना आदमने, डॉ. कुंदन वढाई, डॉ. जयराज कोरपे यांचेही पदग्रहण झाले.  मल्टिपल मायलोमामध्ये किडनी आजार वाढतात. वेळीच आजाराचे निदान झाले तर पुढील गुंतागुंत टाळता येते. दीर्घकालीन किडनी विकारात रुग्णाची प्रकृती स्थिर असेल तरच किडनी प्रत्यारोपण शक्‍य आहे, असे डॉ. भरत शाह म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk of kidney disease with myeloma disease