महापालिकेतर्फे नदी स्वच्छता अभियान आजपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नागपूर - दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेतर्फे नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सोमवारी (ता. ७) नाग, पिवळी व पोरा नदीच्या वेगवेगळ्या भागातून स्वच्छता अभियानाला प्रारंभ होणार आहे. उद्योग, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये आणि नागरिक सहभागी असलेले स्वच्छता अभियान २७ जूनपर्यंत चालणार आहे.

दरवर्षी शहरात नदी स्वच्छता अभियानातून नाग, पिवळी व पोरा नदीची स्वच्छता करण्यात येते. महापालिकेने यावर्षीही स्वच्छतेसाठी तयारी पूर्ण केली आहे. सोमवारी सकाळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते मोहिमेला प्रारंभ होईल. 

उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार गिरीश व्यास, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त वीरेंद्र सिंह, बसप पक्ष नेते मोहम्मद जमाल, राकाँ पक्षनेते दुनेश्‍वर पेठे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया यांच्यासह मनपातील अन्य पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहतील. अभियानात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

आकडेवारीत अभियान
नदी              पात्राची लांबी  

नाग नदी         १८ किमी
पोरा नदी         १२ किमी
पिवळी नदी    १७.५ किमी 

अभियानाचे ठिकाण व वेळ 
नदी - नागनदी
स्थळ : नंदनवन येथील केडीके कॉलेजजवळील पात्र            
वेळ : सकाळी ८ वाजता
नदी - पोरा नदी
स्थळ : सोनेगाव येथील उगमस्थान
वेळ : सकाळी ८.३० वाजता
नदी : पिवळी नदी 
स्थळ : ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रोडवरील पात्र                
वेळ : सकाळी ९ वाजता

Web Title: river cleaning campaign by municipal