पिस्तुलाच्या धाकावर बॅंकेवर दरोड्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर : चेहऱ्याला कापड बांधून आलेल्या दोन दरोडेखोरांनी छोटा ताजबाग परिसरातील एका बॅंकेत दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बॅंकेतील कर्मचारी महिलेच्या डोक्‍यावर पिस्तूल लावून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅंकेत कॅश उपलब्ध नसल्यामुळे चोरट्यांनी खाली हाताने पळ काढला. ही घटना आज गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

नागपूर : चेहऱ्याला कापड बांधून आलेल्या दोन दरोडेखोरांनी छोटा ताजबाग परिसरातील एका बॅंकेत दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बॅंकेतील कर्मचारी महिलेच्या डोक्‍यावर पिस्तूल लावून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅंकेत कॅश उपलब्ध नसल्यामुळे चोरट्यांनी खाली हाताने पळ काढला. ही घटना आज गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा ताजबागजवळ नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा आहे. या बॅंकेत व्यवस्थापक नीता कांबळे यांच्यासह एकूण चार कर्मचारी काम करतात. या बॅंकेत लाखोंची उलाढाल होते. आज गुरुवारी बॅंकेची लिंक फेल झाल्यामुळे ग्राहकांना परत पाठविण्यात आले. त्यामुळे दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कुणीही नसताना दुचाकीवरून दोन दरोडेखोर चेहऱ्याला कापड बांधून आले. त्यांनी बॅंकेत घुसल्यानंतर पिस्तूल आणि चाकू काढून व्यवस्थापक आणि अन्य तीनही कर्मचाऱ्यांना गोळी घालण्याची धमकी देत हात वर करण्यास सांगितले. त्यांनी पैसे ठेवण्याच्या ड्राव्हरची झडती घेतली. मात्र, पैसे न मिळाल्याने त्यांनी कर्मचारी मनीषा घोरमारे यांच्या डोक्‍याला पिस्तूल लावले. तेवढ्यात व्यवस्थापक नीता कांबळे यांनी प्रसंगावधान राखत बॅंकेचे वाहन कॅश घेऊन येत असल्याचे आरोपींना सांगितले. त्यामुळे आरोपींची भंबेरी उडाली. त्यांनी लगेच काढता पाय घेत शटर बंद करून दुचाकीने पळ काढला. या प्रकरणी सक्‍करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती डीसीपी नीलेश भरणे यांनी दिली.
आरोपींनी केली "रेकी'
दोन्ही आरोपींनी दरोडा घालण्यापूर्वी बॅंकेची रेकी केली. बॅंकेत गर्दी नसते, हे हेरून सकाळच्या सुमारास दरोडा टाकण्याचे ठरविले. चोरट्यांनी कॅश कॅबिनमध्ये न जाता केवळ पैसे ठेवण्याचे बॉक्‍सेस तपासले. मात्र, त्यामध्ये पैसे मिळून न आल्याने ते संभ्रमात पडले. पैशाच्या बॉक्‍सेसमध्ये आजच पैसे ठेवण्यात आले नव्हते, हे विशेष.
सीसीटीव्हीत आरोपी कैद
बॅंकेत सीसीटीव्ही नव्हते. परंतु, बॅंकेसमोरील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात दोन्ही आरोपी कैद झाले आहेत. डीसीपी भरणे हे फोटोवरून आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्हीमध्येसुद्धा दोन्ही आरोपी पळून जाताना दिसत आहेत. त्यांच्याकडील दुचाकीला नंबर नव्हता.

 

Web Title: robari on bank in nagpur