अकोला - शिवापुरात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचं गाव हादरल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

अकोला :  पोलिसांचं गाव म्हणून ओळख असलेल्या शिवापूर गावात बुधवारी मध्यरात्री नंतर चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटने गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दोन घर फोडली असून, तीन घरात चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवापूर गावात बुधवारी एकाच रात्रीत गावातील दोन घरे फोडत लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या या घटनांमुळे शिवापूर परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवाय तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केलयाचा प्रकारही उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री साडेचारच्या दरम्यान चोरट्यांनी हा कारनामा केला. चोरट्यांनी गजानन दशरथ कोगदे यांच्या घराच्या दराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील 15 हजारांची रोकड लांबवत एक हजराचे चांदीचे दागिने लंपास केले. दुसरीकडे राजेश मारोतीराव दुधंबे यांच्या घरातील 16 ग्रॅमचे मंगळसूत्र, 21 ग्रॅमची पट्टापोत, 5 ग्रामाची सोन्याची अंगठी, 10 ग्रॅमचे सोन्याचे लहान मुलाचे दागिने रोख रक्कम असा 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. याप्रकणी अज्ञात चोरट्याविरुद्ध खदान पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. ही घटना खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवापूर गावात घडली असल्याने, आता पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

Web Title: robbers are in large number in shivapur akola