Akola News : दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दोन आरोपींना अटक; रोख रक्कम व मोबाईल जप्त
akola
akolaesakal

अकोला - स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम व मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

बार्शीटाकळी पोलिस स्टेशन हद्दीतील मांडोली येथील फिर्यादी महिला ६ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री घरी एकटी हजर असताना रात्री १ वाजताच्या सुमारास तिच्या घरचा दरवाजा तोडून ६ ते ७ अनोळखी इसमांनी महिलेच्या घराबत प्रवेश केला होता.

त्यासोबतच महिलेच्या तोंडामध्ये रूमाल कोंबून चाकूचा धाक दाखवून घरातील सोने चोरी करण्यासाठी घरात दोन ठिकाणी टाईल्स फोडून सोने शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना काही मिळून न आल्याने दरोडेखोरांनी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, विवो कंपनिया मोबाईल व रोख २ हजार २०० रुपये असा एकूण ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.

या प्रकरणी पोलिस स्टेशन बार्शीटाकळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी नामे अर्जुन बाबुलाल राखोंडे (वय ३५ वर्ष, रा. कवाडे नगर, भुसावळ, जिल्हा जळगाव) यास वैजापूर औरंगाबाद येथून ताब्यात घेतले.

सदर आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात चोरी गेलेला विवो कंपनिचा मोबाईल जप्त केला. तसेच मुख्य आरोपी सुभाष लक्ष्मण राखोंडे (वय ३२ वर्ष, रा. बोरगांव पेठ, ता. अचलपूर जिल्हा अमरावती) याला बोरगाव पेठ येथून ताब्यात घेतले.

आरोपीकडून चोरीचे रोख १ हजार रुपये जप्त केले. सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना विचारपूस केली असता त्यांच्यासोबत इतर साथीदारही आरोपी असल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com