परीक्षेच्या तोंडावर फेरमूल्यांकनाचा घोळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची हिवाळी परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, फेरमूल्यांकनाचा निकाल अद्याप न लागल्याने विद्यार्थी चिंतित आहेत. निकाल व उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्‍ससंबंधी परीक्षा विभागाकडे विचारणा केल्यावर विद्यार्थ्यांना असभ्यतेची वागणूक मिळत आहे. 

काही दिवसांपासून निकालाची बोंब असून, फेरमूल्यांकनातही विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मार्च महिन्यापासून उन्हाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर दोनच महिन्यांत निकालास सुरुवात झाली. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केला. त्यानंतर उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्‍ससाठी विद्यार्थ्यांना दीड ते दोन महिन्यांची वाट बघावी लागते. यातही विद्यार्थ्यांना वेगळ्याच विषयाच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्‍स हातात मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत झेरॉक्‍सच मिळाली नाही. तसेच अनेक परीक्षांच्या फेरमूल्यांकनाचे निकाल लागलेले नाहीत. यामध्ये विधी, अभियांत्रिकी, बीएसस्सी शाखेचा समावेश आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यापासून हिवाळी परीक्षा सुरू होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे फेरमूल्यांकनाचे निकालच आले नसल्याने पुढची परीक्षा देणे हाच पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे.

विद्यापीठाला तोडगा सापडेना
16 वर्षांपासून फेरमूल्यांकनाचा प्रश्‍न जसाचा तसा आहे. त्यासंदर्भात अनेकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परीक्षेचे डिजिटलायझेशन झाल्याने समस्या कायमची सुटेल असा विश्‍वास प्र-कुलगुरूंनी व्यक्त केला होता. मात्र, परीक्षेच्या निकालात होत असलेल्या चुका आणि प्रशासनाची दिरंगाईमुळे फेरमूल्यांकनाचा विषय अधिकच गंभीर होत चालला आहे.

Web Title: Round face trial evaluation ado