सरसंघचालकांनी केला रामनापाचा जप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

नागपूर -अवघ्या काही महिन्यांपूर्वी विश्‍व हिंदू परिषदेने अयोध्येतील राममंदिरासाठी आक्रमक होत हुंकार सभांच्या माध्यमातून देश पिंजून काढल्यानंतर काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विहिंपच्या वतीने देशभरात सामूहिक रामनामाचा जप करण्यात आला. विदर्भात एकूण 1200 ठिकाणी सामूहिकपणे रामनामाचा जप करण्यात आला. या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवतही सहभागी झाले होते. त्यांनीसुद्धा रामनामाचा जप केला. 

केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार येवो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभा निवडणुकीनंतरच राममंदिर निर्माणाचे काम सुरू करेल, असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी डेहराडून येथील सभेत केला होता. हिंदू परंपरेनुसार कोणतेही महत्त्वाचे कार्य करायचे असल्यास त्याचा संकल्प नूतनवर्षाच्या प्रारंभी करण्याची पद्धत आहे. याकरिता डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी महाल येथील संघ मुख्यालयाजवळच्या हनुमान मंदिरात रामनामाच्या 108 आवर्तनाच्या एकूण 13 माळा जपल्या. रविवारी उपराजधानीत सुमारे 50 ठिकाणी रामनाम जपाचे अधिष्ठान झाल्याची माहिती विहिंपच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: RSS chief Mohan Bhagwat chanted Lord Ram on eve of Loksabha election