संघाच्या बदनामीचा मंत्र इम्रान खान यांना अवगत : भागवत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

मंदीची चर्चा नको
भारतातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने चांगले काम केले आहे. या सरकारने उपाययोजना नक्कीच केल्या आहेत. तेव्हा देशातील आर्थिक मंदीवर सातत्याने चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे भागवत म्हणाले. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी थेट विदेशी गुंतवणूक आणि उद्योगांचे खासगीकरण आवश्यक असून सरकार त्यासाठी बाध्य झाले आहे, असे म्हणत सरसंघचालकांनी खासगीकरण आणि एफडीयायचे समर्थन केले.

नागपूर : संघाचे काम वाढते आहे. संघाकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना विरोधी तोडण्याच्या प्रयत्नात आहेत. आपले कर्म यशस्वी होत नसतील तर संघाला बदनाम करण्याचा मंत्र आता पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान यांना देखील अवगत झाला असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.  

नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. मंचावर एचसीएलचे अध्यक्ष शिव नाडर उपस्थित होते. याप्रसंगी भागवत यानी राजकीय, समाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य केले. संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते. मात्र अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही. असा प्रकार भारतात शक्यच नसून, भारतात विविधता असूनही लोक शांततेत जगतात, असे उदाहरण दुसरीकडे कुठे मिळणार ? हा प्रश्न भागवत यांनी विचारला. याबाबत बोलताना भागवत यांनी येशू ख्रिस्त यांच्या काळातील उदाहरणे दिली. ही संस्कृती आपली नसून पाश्चिमात्य देशातून आल्याचे मत व्यक्त केले.  

देशात काही ठिकाणी अच्याचाराच्या घटना घडतात. मात्र त्या एका समुदायाने दुसऱ्या समुदायावर केल्या असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एखाद्या समुदायातील 5-10 लोकांनी कुणावर अत्याचार केले म्हणून त्या संपूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कायदा आपले काम करेल. ज्यांना शिक्षा करायची आहे आणि जर देशात तेवढा
कठोर कायदा नसेल तर नेतृत्वाने तो तयार करावा असे सांगताना सत्तेत स्वयंसेवक असेल तर हे त्याचे कर्तव्य असल्याचे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी कलम ३७० च्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. 
 
मंदीची चर्चा नको
भारतातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने चांगले काम केले आहे. या सरकारने उपाययोजना नक्कीच केल्या आहेत. तेव्हा देशातील आर्थिक मंदीवर सातत्याने चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे भागवत म्हणाले. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी थेट विदेशी गुंतवणूक आणि उद्योगांचे खासगीकरण आवश्यक असून सरकार त्यासाठी बाध्य झाले आहे, असे म्हणत सरसंघचालकांनी खासगीकरण आणि एफडीयायचे समर्थन केले.

वैश्विक अर्थव्यवस्थेत मंदी आहे. त्याचे सर्वत्र परिणाम दिसून येत आहे. अमेरिका आणि चीनमधील आर्थिक स्पर्धेचे परिणाम भारताला भोगावे लागत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार गेल्या अडीच महिन्यापासून कार्यरत आहे. जनतेच्या हिताप्रती सरकार संवेदनशीलतेने कटिबद्ध आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. या तथाकथित आर्थिक मंदीतून आपण निश्चितपणे बाहेर येणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS chief Mohan Bhagwat targets Pakistan PM Imran Khan in Nagpur