स्वयंसेवक घेणार अखंड भारताचा संकल्प

राघवेंद्र टोकेकर
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर : जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने हटविल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उत्साहित झाले असून, अखंड भारत संकल्पदिनाचे जाहीर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. संघातर्फे सातत्याने अखंड भारताचा पुरस्कार केला जात असला तरी यंदा अखंड भारताचे तब्बल 20 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

संघभूमी नागपुरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला "अखंड भारत संकल्पदिन' साजरा होणे नवीन नाही. मात्र, हा कार्यक्रम आतापर्यंत फारसा वाजागाजा न करता होत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 रद्द करून देशवासीयांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामनातील अखंड भारताच्या संकल्पाला संजीवनीच मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन विभागातर्फे शहरात सुमारे 20 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अखंड भारताच्या संकल्पनेला नव्याने ऊर्जा मिळाल्याचा आनंद कार्यक्रमाच्या माध्यमातून संघभूमीत साजरा होणार आहे.
हिंदू महासभेच्या वतीने अखंड भारताचे कार्यक्रम दरवर्षी व्हायचे. मात्र, या कार्यक्रमास मोजके कार्यकर्ते उपस्थित असायचे. संघपरिवारातील संघटनांनी मृतावस्थेत गेलेल्या या कार्यक्रमांना "हायजॅक' करीत व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाचाही त्यांना सबळ पाठिंबा मिळाल्याने अखंड भारत संकल्पदिनाला युवाशक्‍तीचे मोठे बळ मिळाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS news