मुदत संपली तरीही आरटीई प्रवेशाचे भिजत घोंगडे कायम, 122 शाळांमध्ये 1347 जागा राखीव

RTE admission process still not complete in wardha
RTE admission process still not complete in wardha

वर्धा : बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळामध्ये प्रवेश देण्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया ऑनलाइन होत असते. मात्र, आता त्यालाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. आतापर्यंत तीनवेळा मुदत वाढवूनही प्रवेशाचे भिजत घोंगडे कायम आहे.

दिवाळीच्या सुट्ट्‌यानंतर दुसऱ्या सत्रातील शाळा सुरू  झाली. दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतले नाहीत. प्रवेश प्रक्रियेचे हे भिजत घोंगडे कधीपर्यंत चालणार? असा प्रश्‍न आता पालकांना पडला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव कोट्यातून प्रत्यक्ष प्रवेश मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेला अपेक्षेनुसार गती मिळाली नसल्याने दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावेत म्हणून पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रभाव असल्याने आरटीईसाठी 17 मार्च रोजी राज्यस्तरावर व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे भाग्य सोडत काढण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लॉकडाउनमुळे प्रक्रिया थांबली. मग प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया शाळा स्तरावर सुरू  झाली. तरीही गती आली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 1029 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित, तर 935 विद्यार्थ्यांच्या पालकांनी तात्पुरते प्रवेश (प्रोव्हिजनल) घेतले आहेत. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतरही संपूर्ण जागांवर प्रवेश होऊ शकले नाहीत.

दुसऱ्या सत्रानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरूच -
लॉकडाऊनमुळे शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. प्रवेशासाठी पालकांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. दुसरे शैक्षणिक सत्र सुरू  होऊनही आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे, असे प्रथमच घडले आहे.

जागा - 1347
अर्ज - 4853
निवड - 1343
तात्पुरते प्रवेश - 935
निश्चित प्रवेश  - 1029

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com