मला श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा मी आभारी आहे, पण मी ठणठिणत!

rumour goes viral of doctor vitthal vaghs death
rumour goes viral of doctor vitthal vaghs death

अकोला : सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचे निधन झाल्याची खोडसाळपणा करणारी बातमी सायंकाळी सोशल मीडियावर पसरताच खळबळ उडाली. हे वृत्त त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी श्रद्धांजली वाहणाऱ्यांचे आभार मानले आणि मी एकदम ठणठणीत असल्याचा संदेश चाहत्यांना दिला.

मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यानिमित्त डॉ. विठ्ठल वाघ बुधवारी अमरावती येथे गेले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात डॉ. विठ्ठल वाघ उपस्थितांना मार्गदर्शन करीत असतानाच त्यांच्या निधनाचा एक खोडसाळपणा करणारा संदेश अमरावतीच्या एक व्हाॅटस् ॲप ग्रुपवर व्हायलर झाला.

सोशल मीडियातून उमटलेला हा संदेश बघता-बघता वाऱ्यासारखा पसरला तो थेट अकोल्यात खेडकर नगरातील डॉ. विठ्ठल वाघ यांच्या घरापर्यंत काही मिनिटात जाऊन पोहोचला. विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सकाळी निघालेल्या ग्रंथ दिंडीतही ते सहभागी होते. सायंकाळी ६ वाजता त्यांचे प्रमुख वक्ते म्हणून भाषण होणार असतानाच सायंकाळी ५.४५ वाजता डॉ. विठ्ठल वाघ यांचे निधन झाल्याचा मॅसेज सोशल मीडियावर धुमाकुळ घालू लागला. या मॅसेजमुळे डॉ. विठ्ठल वाघ यांच्या चाहत्यांनी थेट सांस्कृतिक भवनात धाव घेतली. त्यावेळी वाघ भाषण देत असल्याचे पाहून अनेकांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान, विठ्ठल वाघ गेलेत ही बातमी अकोल्याला त्यांच्या घरीही पोहोचली होती. विठ्ठल वाघ यांचे मित्र शेतकरी नेते विजय विल्हेकर यांनी सांस्कृतिक भवन गाठून विठ्ठल वाघ यांना नेमका काय प्रकार घडला याची माहिती दिली. विठ्ठल वाघ यांनी भ्रमणध्वनीद्वारे घरी संपर्क साधून मी जिवंत असल्याचा संदेश दिला. त्यामुळे कुटुंबियाचाही जीव भांड्यात पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com