विलेपार्ले बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नागपूर - विले पार्लेमधील बलात्कार प्रकरण विशेष जलदगती न्यायालयाज चालविण्यात यावे, अशी मागणी सुप्रसिद्ध गीतकार खासदार जावेद अख्तर आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना एनसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. 

नागपूर - विले पार्लेमधील बलात्कार प्रकरण विशेष जलदगती न्यायालयाज चालविण्यात यावे, अशी मागणी सुप्रसिद्ध गीतकार खासदार जावेद अख्तर आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना एनसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. 

विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना शायना एनसी यांनी सांगितले, की विलेपार्ले येथील 25 वर्षीय फिजिओथेरेपिस्टचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. चौकशीनंतर तरुणीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काही प्रसारमाध्यमांनी बलात्कार पीडितेचे नाव आणि छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यामुळे घटनेची बळी ठरलेल्या युवतीची बदनामी झाली आहे. अशा प्रसारमाध्यमांवरही कारवाई करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांना केल्याचे त्यांनी सांगितले. 

"त्या' महिलेसाठी कायदा शिथिल करा 
मुंबईतील एका रुग्णालयात 50 वर्षीय महिला दाखल असून, तिला किडनीची आवश्‍यकता आहे. या महिलेचे रक्ताच्या नात्यातील कुणीच नाही. मात्र तिचा चाहता वर्ग असून, त्यांनी तिला किडनी देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र कायद्याची अडचण आहे. त्यामुळे "त्या' महिलेसाठी आपल्या अधिकारांचा वापर करून कायदा शिथिल करावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याचे जावेद अख्तर यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किडनी मिळवून देण्याचे आश्वासन दिले, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Run fast Vile Parle rape case in court