वाघाच्या दर्शनासाठी जंगलात गेला 'देव' 

Sachin Tendulkar safari in tadoba
Sachin Tendulkar safari in tadoba

चंद्रपूर : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचे वाघ्रपेम काही नवीन नाही. जेव्हा-जेव्हा विदर्भात आला वाघ्र दर्शनाचे मोह त्याला काही आवरता आले नाही. खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त शुक्रवारी नागपुरात आला असता सचिन ताडोबा वाघ्र प्रकल्पात गेला. यापूर्वीही तो नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघ्र दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याला वाघाचे दर्शनही झाले होते. 

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक वाघांना बघण्यासाठी ताडोबात दाखल होत असतात. येथील वाघोबांनी अनेकांना भूरळ घातली आहे. त्यात आता क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर याचाही समावेश आहे. तेंडुलकर वाघोबांचे दर्शन घेण्यासाठी ताडोबात दाखल झाला आहे. क्रिकेटच्या जगतात सचिन तेंडुलकरचे नाव आदराने घेतले जाते. तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. चंद्रपूरच्या ताडोबातील वाघांनी तेंडुलकरला भूरळ घातली. त्यामुळेच येथील वाघोबांची झलक बघण्यासाठी तेंडुलकर ताडोबात दाखल झाले आहे. 

मागच्या वेळेस उमरेड कऱ्हांडला आला असताना सचिनने चाहत्यांना कोडेसुद्धा घातले होते. "मी निसर्गाचा सानिध्यात आहे. ओळखा पाहू कुठे?' असे कोडेही घातले होते. मी महाराष्ट्रात आहे असा "क्‍ल्यू'पण दिला होता. त्यावेळी चाहत्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटस्थळांची नावे उत्तरादाखल टाकली होती. अनेकांनी त्यावेळी ताडोबात आहात असे उत्तर दिले होते. मात्र, उमरेड कऱ्हांडला आहात असे उत्तर फार कमी लोकांनी दिले होते. गेल्यावेळी अशी ट्विट करणाऱ्या सचिनने यावेळेस असे कोडे घालणारे ट्विट केले नाही. मात्र, 24 जानेवारी या राष्ट्रीय बालिकादिनानिमित्त विशेष ट्‌विट केले आहे. "आज राष्ट्रीय बेटी दिवस है. इस खास मौकेपर हम अपनी बेटिओ को अनके सपनो को पुरा करने की पुरी आजादी दे' या आशयाचे हिंदी व इंग्रजीमध्ये ट्‌विट केले आहे. 

उमरेड कऱ्हांडला भेट

वाघांचे दर्शन घेण्यासाठी यापूर्वी म्हणजे 20 फेब्रुवारी 2016 मध्ये सचिन तेंडुलकरने नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत पत्नी डॉ. अंचली, मुलगा अर्जून व क्रिकेटर मित्र प्रशांत वैघ, सुब्रतो बॅनर्जी, समिर डिगे आणि अतुल रानडे सोबत होते. यावेळी सचिनने चारवेळा जंगल सफारी केली होती. त्याला वाघाचे दर्शनही झाले होते. 

नागरिकांची तोबा गर्दी

उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात सचिन आल्याचे समजताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी नागरिक व वनरक्षकांनी सचिन सोबत छायाचित्रही काढले होते. यावेळी त्यांनी सचिनला तरत उमरेडला भेट देण्यायची विनंती केली होती. यंदा सचिन उमरेडला न जाता चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा प्रकल्पात गेला. त्यामुळे परताना तो उमरेड कऱ्हांडला भेट देणार का, असा प्रश्‍न चाहत्यांना पडला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com