संत गाडगेबाबा विद्यापीठ राबविणार 'स्नेहानुबंध' अभियान, कोरोनाबाधितांना मदतीचा हात

सुधीर भारती
Wednesday, 23 September 2020

विद्यापिठाशी संलग्नित असलेल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील रुग्णांना स्नेहानुबंध अभियानाद्वारे मानसिक समुपदेशन आणि इतर सेवा देण्यात येणार आहेत. डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व रासेयो विभाग लवकरच अभियान राबविणार आहे.

अमरावती  : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. उपचारानंतर त्यांना १४ दिवस गृहविलगीकरणात ठेवले जाते. या काळात त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि साहित्या पोहोचवायला कुणीही समोर येत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना एक मानसिक आधार मिळावा यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 'स्नेहानुबंध' अभियान हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापिठाशी संलग्नित असलेल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील रुग्णांना स्नेहानुबंध अभियानाद्वारे मानसिक समुपदेशन आणि इतर सेवा देण्यात येणार आहेत. डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व रासेयो विभाग लवकरच अभियान राबविणार आहे.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर
 

विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयातील शिक्षकांकरिता एक आठवडा कालावधीची मानसिक समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी तसेच रुग्णांचे समुपदेशन कसे करावे? याबाबत शास्त्रोक्त माहिती देण्यात आली होती. यामध्ये 242 शिक्षकांनी यशस्वीरित्या कार्यशाळा पूर्ण केली आहे. तसेच विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विभाग व महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य, प्राध्यापक यांना पुन्हा विशेष प्रशिक्षण देऊन रुग्णांचे मानसिक समुपदेशन कार्य करण्यात येईल.

या अभियानामध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका, नगरपरिषद इत्यादी शासकीय यंत्रणेची मदत घेतली जाईल. प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. रासेयोचे क्षेत्रीय समन्वयक, महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवक यांच्यामार्फत सेवाकार्य पूर्णत्वास जाईल.

संपादन : भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saint gadgebaba amravati university will organized campaign to help corona positive patients