अमरावतीच्या साजिद खानचा अनोखा "जुगाड';पेट्रोलवर चालणारा रिक्षाकटला 

file photo
file photo

अमरावती ः पेट्रोलवर चालणारा रिक्षाकटला आणि त्याचा ऍव्हरेज प्रति लिटर 40 किलोमीटरचा. हे ऐकून जरा नवलच वाटते. मात्र अमरावतीच्या एका जुगाडू कटला चालकाने आपल्या रिक्षाकटल्याचे रुपांतर पेट्रोलच्या रिक्षात केले आहे. विशेष म्हणजे पेट्रोलवर चालणारा हा रिक्षाकटला एका स्वीचद्वारे सायकल रिक्षासुद्धा होऊ शकतो. या जुगाडू युवकाचे नाव साजिद खान अहमद खान असून तो छायानगर परिसरात राहतो. 

रिक्षा किंवा कटला चालक पायडलचा रिक्षा चालवून आपले पोट भरतात. पायडलच्या रिक्षामुळे कालांतराने अनेकांना गुडघेदुखी, सांधेदुखी सारखे विकार जडतात आणि ते मजुरी करण्यास असक्षम बनतात. आपलेही तसे होऊ नये, असा विचार करीत साजिद खान यांनी चार वर्षांपूर्वी एका मॅकेनिक मित्राचा सल्ला घेतला. रिक्षाला मोपेडचे इंजिन लावता येऊ शकेल का?, यावर त्यांचे प्रयोग सुरू झाले. सुरुवातीला एक जुनी मोपेड त्यांनी विकत घेतली. त्या मोपेडचे इंजिन काढून ते कटल्याच्या खालच्या भागाला जोडले. पेट्रोलची टाकी सीटच्या खाली बसविण्यात आली आणि त्यातून पेट्रोलचा सप्लाय देण्यात आला. विशेष म्हणजे याच ठिकाणी एक स्वीच लावण्यात आले. ज्यावेळी पेट्रोलची गरज नसेल किंवा पेट्रोल नसेल तेव्हा या स्वीचचा वापर करून तीच रिक्षा सायकल रिक्षामध्ये रुपांतरित केली जाऊ शकते. यासाठी साजिद खान यांना जवळपास 20 हजारांचा खर्च आला. आता या पेट्रोल रिक्षाच्या माध्यमातून अतिशय जलदगतीने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकते. विशेष म्हणजे पेट्रोलची ही रिक्षा 40 किलोमीटरचा ऍव्हरेज देते, असा दावा साजिद खान यांनी केला. दवाबाजार येथील भगवती मेडिकल्समध्ये ते अनेक वर्षांपासून सेवा देतात. 

कटलारिक्षा तयार केल्यानंतर अनेकांनी माझे कौतुक केले. मी माझ्या मित्रांच्या मदतीने पेट्रोलवर चालणारा रिक्षाकटला तयार केला. त्यामध्ये त्यांचेसुद्धा महत्त्वाचे योगदान आहे. या रिक्षाच्या वापरामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी सारखी कुठलीही तक्रार नाही. उलट कमीत कमी वेळेत माल दुसऱ्या ठिकाणी हलविता येतो. 
-साजिद खान अहमद खान, रिक्षाचालक  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com