#SakalSamvad पुलिस से दुश्‍मनी नहीं दोस्ती अच्छी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर - ‘पुलिस से ना दोस्ती अच्छी.. ना दुश्‍मनी’ असा एका हिंदी चित्रपटातील डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. यात किती तथ्य आहे, हे माहिती नाही. मात्र सर्वसामान्य माणूस पोलिसांपासून दोन हात दूर राहणेच पसंत करतो हेही तेवढेच खरे. पोलिस आपला माणूस आहे, त्याच्याविषयी आपुलकी वाटायला लागल्यास अनेक समस्या आपसूक सुटू शकतात. वर्दीतील पोलिस दिसला तरी गुंड कितीही कुख्यात असो तो घाबरतोच.

याकरिता आपण पोलिसांचे पायी पॅट्रोलिंग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शहराचे नवे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये आयुक्तांनी सकाळच्या कर्मचाऱ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी काय काय केले जात आहे, याचीही माहिती दिली.

पायी पॅट्रोलिंग
वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पाच ते दहा जवानांच्या पथकाची नियमितपणे पायी पॅट्रोलिंग शहरात सुरू केली आहे. यादरम्यान पोलिस नागरिकांशी संवादही साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सामान्य माणूस पोलिस ठाण्यात जायला घाबरतो. सहसा तक्रारही करीत नाही. संवादातून समस्या जाणून घेऊन पोलिस पथकामार्फत कारवाई केली जाईल. पोलिसांच्या उपस्थितीमुळे अनेक समस्या सुटू शकतात. 

Web Title: #SakalSamvad #Cp #Nagpur Police Enemy Friend