सक्करदरा तलावाच्या संरक्षक भिंतीचा मार्ग मोकळा

file photo
file photo

नागपूर : शहरातील पुरातन वास्तूंच्या दुरुस्तीसंदर्भात मंगळवारी हेरिटेज समितीने सकारात्मक निर्णय घेतले. यात सक्करदरा तलावाभोवती संरक्षक भिंत उभारण्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी जागनाथ बुधवारीतील शिवमंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही सकारात्मक पावले उचलण्यात आली.
शहरातील विविध पुरातन वास्तूंसंदर्भात हेरिटेज कमिटीची बैठक महापालिकेत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती होते. वास्तुविशारद अशोक मोखा, स्ट्रक्‍चरल अभियंता पी. एस. पाटणकर, एलएडी कॉलेजच्या उज्ज्वला चक्रदेव, नागपूर विद्यापीठातील इतिहास विभागाच्या डॉ. शोभा जौहरी, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे आदी उपस्थित होते.
अशोक मोखा यांनी जागनाथ बुधवारीतील शिवमंदिराच्या जीर्णोद्धारापासून पुरातन वास्तूच्या दुरुस्तीचे कार्य सुरू करण्याची सूचना केली. समितीने सक्करदरा तलावाची संरक्षक भिंत बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याशिवाय महाल येथील राष्ट्रीय वाचनालयाच्या जीर्ण इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. 1863 मध्ये या वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले होते. समितीने गुरुनानक देव जयंती कस्तुरचंद पार्क येथे साजरी करण्यासही मंजुरी दिली. कस्तुरचंद पार्कची भिंत तोडून बांधकाम करण्याची परवानगी मेट्रोला देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com