शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

सावनेर (जि. नागपूर)  : लागवड केलेले कपाशीला तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही पात्या, बोंडे अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यात फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कंपनीने विकलेले बियाणे निकृष्ट व बोगस दर्जाचे असून चौकशी करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी उमरी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

सावनेरच्या कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, उमरी येथील तीस ते चाळीस शेतकऱ्यांनी इको कंपनीचे बियाणे खरेदी करून त्याची शेतात लागवड केली. लागवडीनंतर तीन महिन्यांचा कालावधी शेतकऱ्यांनी झाडांची चांगली मशागत केली. झाडावर चुरडा रोग आला, फवारणी करूनही त्यावरील चुरडा निघालेला नाही. याशिवाय तीन महिन्यानंतरही झाडांना अद्याप पात्या व बोंडे धरण्याचे प्रमाण फारच कमी आहे. गावातील सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच आहे. याची तक्रार केल्यावर इको कंपनीच्या लोकांनी पाहणी केली. तर कस्टमर केअर असलेल्या कीर्तिमान ऍग्रो जेनेटिक्‍स लि, (अहमदाबाद) यांना सूचना दिल्यावर त्यांनी बिले व पाकिटे, प्लॉट नं. व बॅच नंबर जपूण ठेवावे असे सांगितले आहे. 
कृषी विभागाने इको कंपनीच्या या बियाण्याची चौकशी करून योग्य अहवालासह कंपनीवर कार्यवाही करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी उमरी येथील वसंत कोंगरे, मुकुंद घुगल, रमेश निखाडे, वसंत निखाडे, प्रभाकर ताजने, जनार्दन चिपडे, खेमराज वाडी, चंद्रभान बोंडे, मनोहर देवळकर, अरविंद आसोले, दशरथ कोंगरे, चिंतामण सारवे, चंदू डाखळे यांनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of bogus seeds to farmers