
सेमाडोहमध्ये बनावट विदेशी दारूचा गोरखधंदा चालविण्यासाठी आर्थिक पुरवठा हा अटकेत असलेल्या अमरावतीमधील दोघांकडून केल्या जात होता, असे गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दहापैकी प्रकाश मालवीय याला दारू बॉटल पॅकिंगच्या कामाचा अनुभव होता.
चिखलदरा (जि. अमरावती) : तालुक्यात सेमाडोहमध्ये बनावट विदेशी दारू तयार करून बाजारपेठेत पुरवठा करून सर्रास विक्री सुरू होती. स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दहा जणांना अटक केली. आतापर्यंत चाललेल्या गोरखधंद्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा कर बुडाला.
चंदन गगनदास नागवानी (वय ३०, रा. कृष्णानगर), प्रकाश उद्धवदास रावलानी (वय ३८, रा. रामपुरीकॅम्प, अमरावती), गोलू बाबू मुंडे (वय ३७, रा. सेमाडोह), जयेश देवीसिंग सोनिया (वय २२, रा. आरपीएफ कॉलनी, रतलाम), संजय समरत मालवीय (वय २१, रा. रेलनगर, रतलाम), आकाश राधेशाम सिंदल (वय १८, रा. नागदा), नरेंद्र भेरूलाल चव्हाण (वय २१), प्रकाश रामलाल मालवीय (वय ३१, दोघेही रा. खारवाकला), सुनील दुर्गाशंकर चव्हाण (वय २५, रा. नागदा), शाकीरखॉं शकूरखॉं (वय ३६6, रा. खारवाकला), अशा दहा जणांविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ही मंडळी सेमाडोहच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात बनावट विदेशी दारू तयार करताना आढळली. त्यात बनावट दारू, लेबल, काचेच्या बॉटल, झाकणे, प्लॅस्टिक ड्रम, पाण्याच्या बिसलेरीच्या मोठ्या ३६ कॅन, एक हजार लिटर मद्यार्क, एक स्टील कोटी, देशीदारूच्या काचेच्या रिकाम्या ६ हजार ३२० बाटल्या,
५०० व ३०० लिटर क्षमतेच्या दोन टाक्या, काचेचे चंचूपात्र, मोजमापक अंक लिहिलेले काचेचे हायड्रोमीटर व थर्मामीटर, सात लिटर व्हिस्की फ्लेवर, एमपी ०५ डीए ०४५२, एमएच२७ बीझेड ०६८५, १२ मोबाईल, नगदी दोन हजार ९८० रुपये, असा एकूण १७ लाख ६० हजार ३४० रुपयांचा माल जप्त केला.
सेमाडोहमध्ये बनावट विदेशी दारूचा गोरखधंदा चालविण्यासाठी आर्थिक पुरवठा हा अटकेत असलेल्या अमरावतीमधील दोघांकडून केल्या जात होता, असे गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दहापैकी प्रकाश मालवीय याला दारू बॉटल पॅकिंगच्या कामाचा अनुभव होता.
जाणून घ्या - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत
मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीमध्ये बनावट दारू तयार करण्याचे काम काही दिवसांपासून सुरू होते. हे वसतिगृह आदिवासी विभागाचे नाही. शासकीय इमारत वापरायला परवानगी कुणी दिली, याबाबत गुन्हेशाखेकडून चौकशी सुरू झाली.
संपादन - नीलेश डाखोरे