विदेशीपेक्षा ठरतेय ‘कंट्री’ भारी! 

deshi
deshi

अकोला : दारू पिण्याचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनत जरी असला तरी राज्य शासन मिळणाऱ्या महसुलापोटी विविधांगी प्रयोग करित आहे. याचाच परिणाम मद्यविक्रीवर झाला असल्याचे चित्र अाहे. जिल्ह्यात मद्यविक्री जोमाने जरी होत असली तरी विदेशी मद्यापेक्षा तळीरामांचा देशी दारू पिण्याकडे असल्याचे चित्र अाहे. कारण दर दिवशी जिल्ह्यात तब्बल १९ हजार बल्क लिटर देशी मद्य तळीराम पीत असून, या तुलनेत विदेशी मद्याचा खप जेमतेम अाहे. एकूणच जिल्ह्यात विदेशीवर ‘कंट्री’ भारी पडत असल्याचे चित्र आहे. 

राज्याचा महसूल वाढावा यासाठी राज्यसरकार कडून विविधांगी प्रयोग केले जात अाहेत. यामध्ये विदेशी मद्य (व्हिस्की, रम, स्कॉच वैगेरे) पिणाऱ्यांवर सरकार मेहेरबान झाले आहे. वार्षिक मद्य परवाना अर्ज स्थानिक पातळीवरच २४ तासांच्या आत मंजूर करण्याचे अादेश राज्यसरकारने ७ जानेवारी रोजी निर्गमीत केले होते. तर दुसरीकडे १ जानेवारीपासून याच विदेशी मद्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. अागामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारने महसूल वाढविण्यासाठी केलेला हा प्रयत्न जिल्ह्यात यशस्वी होताना दिसत अाहे. मात्र, जिल्ह्यातील तळीरामांचा विदेशी पेक्षा देशी मद्याकडे कल वाढलेला असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात मागील एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या दहा महिन्याच्या कालावधीत ५६ लाख ८४ हजार ८६० बल्क लिटर देशी मद्य विक्री झाले तर या तुलनेत विदेशी मद्य ११ लाख ६९ हजार ८८ बल्क लिटर, बिअर ११ लाख ९६ हजार ३०० बल्क लिटर, तर वाईन दोन हजार ९८ बल्क लिटर विक्री झाल्याचे चित्र अाहे. विदेशी मद्याचे वाढते दर तळीरामाना न सोसणारे असल्याने स्वस्तात मिळणारी देशी दारू पिण्यातच धन्यता मानली जात अाहे. 

‘कंट्री’ची दर दिवसाला १९ हजार बल्क लिटर विक्री 
देशी मद्य पिणाऱ्यांची वाढती संख्या पाहता मागील दहा महिन्यात जिल्ह्यात ५६ लाख ८४ हजार ८६० बल्क लिटर देशी मद्य विक्री झाले अाहे. महिन्याला हे मद्य ५ लाख ६८ हजार ४८६ तर दिवसाला १८ हजार ९५६ बल्क लिटर असे विक्री होते. या तुलनेत दर दिवशी विदेशी मद्य ३ हजार ८९७, बिअर ३ हजार ९८७ अाणि वाईन ६७ बल्क लिटरमध्ये विक्री होत असल्याचे चित्र अाहे. एकूणच तळीराम देशी मद्याकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे खेदजनक चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत अाहे. 

अशी झाली दारूची बल्क लिटरमध्ये विक्री (एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९) 
देशी- ५६ लाख ८४ हजार ८६० 
विदेशी-११ लाख ६९ हजार ०८८ 
बिअर-११ लाख ९६ हजार ३०० 
वाईन-२० हजार ९८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com