गुणवंत मलकवडे
गुणवंत मलकवडे

रोज 100 कॅन चिल्ड पाण्याची विक्री

नागपूर :  नोकरी करायची नाही हे पक्क होतं... चार वर्षांपूर्वी थंड पाण्याच्या कॅन विक्रीचा व्यवसाय सुरू केला... एप्रिल ते जूनमध्ये 50 ते 100 कॅनची सहज विक्री होते... "जल ही जीवन है' आपण म्हणतो, परंतु पाण्यामुळे मला जीवनात "अर्थ'ही गवसला...गुणवंत मलकवडे उत्साहाने सांगत होते.
काटोल रोडवरील पेट्रोल पंपाशेजारी गुणवंत मलकवडे राहतात. त्यांची परिस्थिती बेताचीच होती. तरी जिद्द मात्र उद्योजक व्हावे ही होती. वडिलांनी खूप वर्षांपूर्वी काटोल रोडवर जागा घेतली होती. त्या जागेचा लाभ मिळविण्यासाठी गुणवंत यांनी डेकोरेशनच्या व्यवसायाला प्रारंभ केला. अपार मेहनतीच्या बळावर काही वर्षांमध्येच ते स्थिरस्थावर झाले. अंगभूत व्यावसायिकाची जिद्द शांत बसू देत नव्हती. त्यांच्या शोधक नजरेने पाणी विक्रीतून लाभ मिळविता येईल ही बाब हेरली. जास्त काथ्याकुट न करता चार वर्षांपूर्वी त्यांनी 500 लिटरचा आरओ फिल्टर व चिलर विकत घेतले. यासाठी त्यांना तीन लाखांचा खर्च त्यावेळी आला. पहिल्या दोन वर्षांतच त्यांनी केलेली गुंतवणूक पुरेपूर निघाली. घरी चांगली पाणीपातळी असलेली स्वतःची विहीर असल्यामुळे टंचाईचा जास्त त्रास जाणवला नाही. सध्या त्यांचा मुलगा हा घरोघरी वाहनाद्वारे ऑर्डर दिलेल्या ग्राहकांना थंड पाण्याच्या कॅन पोहोचवतो. तर गुणवंत हे स्वतः घरासमोर छोटेसे दुकान उघडून विक्री करत आहेत.
ऐन टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी पुरवल्यामुळे सामाजिक भान जपल्याचेही समाधान मिळते. या व्यवसायात चिकाटीची गरज आहे. कारण दिवसेंदिवस स्पर्धा तीव्र होत चालली आहे. खरे तर हा सिजनल व्यवसाय आहे. परंतु, वर्षभर विविध कार्यालये आणि घरगुती समारंभांना पाणीपुरवठा शक्‍य आहे.
-गुणवंत मलकवडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com