डोक्‍यावर "भारत' कोरणाऱ्या बलरामची सलमानने घेतली भेट

सलमान खानसोबत बलराम गेहानी. बलरामने आपल्या डोक्‍यांच्या केसांवर कोरलेला "भारत'
सलमान खानसोबत बलराम गेहानी. बलरामने आपल्या डोक्‍यांच्या केसांवर कोरलेला "भारत'

सलमान खानसोबत बलराम गेहानी. बलरामने आपल्या डोक्‍यांच्या केसांवर कोरलेला "भारत'
नागपूर : अभिनेता सलमान खानचे जगभरात फॅन्स आहेत. आपल्या लाडक्‍या "भाईजान'साठी हे फॅन्स काय करतील याचा कधीच नेम नसतो. जरीपटका येथे राहणाऱ्या बलराम गेहानी या "दबंग' पठ्ठ्याने बहुचर्चित "भारत' या चित्रपटासाठी डोक्‍यावर "भारत' असे कोरून घेतले आहे. त्याची ही भक्‍ती पाहून खुद्द सलमान खान यानेच त्याला प्रीमियर शोसाठी आमंत्रित केले होते.
सलमान आणि कॅटरिना यांची मुख्य भूमिका असलेला "भारत' 5 जूनला प्रदर्शित झाला. तत्पूर्वी चार जूनला मुंबईत या चित्रपटाचा प्रीमियर झाला. त्यास खास निमंत्रित व सिनेक्षेत्रित दिग्गजांमध्ये बलराम उपस्थित होता. आपल्या लाडक्‍या अभिनेत्याचा चित्रपट मोठ्या पडद्यावर शांतपणे पाहता यावा यासाठी बलराम संपूर्ण थीएटरच बूक करतो. इतकेच नव्हे तर बलराम डोक्‍यावर चित्रपटाचे नाव कोरून घेतात. यंदाही त्यांनी "भारत' असे कोरून घेतले आहे. विशेष म्हणजे बलराम यांनी बजरंगी भाईजानच्या वेळी दोनदा, सुलतानच्या वेळी तीनदा, प्रेम रतन धन पायोच्या वेळी दोनदा असेच डोके भादरले होते. या फॅनची सलमान खान यांच्यासोबत दोनवेळा भेट झाली आहे. यावेळी सलमानने त्याला चक्‍क "भारत' चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी मुंबई येथे बोलवून सुखद धक्का दिला. यावरून सलमान आपल्या चाहत्यांना किती जपतो हे दिसून येते.
बलराम गेहानी जरीपटका येथे राहत असून, गांधीबाग भागात नोकरी करतो. 24 जानेवारी 2014 रोजी सोहेल खान यांनी दिग्दर्शित केलेला "जय हो' चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासून बलराम गेहानी सलमान खानचा जबरा फॅन झाला. त्यानंतर प्रत्येक चित्रपटासाठी खास हेअर स्टाईल करायची. त्यासाठी सलून मालकाशी मैत्री साधायची अशा सर्वच कसरती त्यांच्या असतात. पुढे चित्रपट जेवढा चालेल तेवढ्या दिवस डोक्‍यावर भारत ठेवून वावरायचे अशा त्यांचा निश्‍चय यंदाही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com