esakal | कर्तव्याला सलाम! अमरावतीत कोविड वॉर्डातील परिचारिकेचे पुष्पवृष्टीने स्वागत 
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati Narse

गणेश विहार क्रमांक दोन येथील रहिवासी असलेल्या सुनीती हरणे यांची कोविड वॉर्डात नियुक्ती करण्यात आली होती. सलग पंधरा दिवस त्यांनी या वॉर्डात दाखल कोरोना संक्रमित रुग्णांना उपचार देण्यासोबत समुपदेशन व मार्गदर्शन करीत सेवा दिली. संक्रमित रुग्णांच्या संपर्कात त्या सातत्याने राहिल्याने त्यांनाही चौदा दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते.

कर्तव्याला सलाम! अमरावतीत कोविड वॉर्डातील परिचारिकेचे पुष्पवृष्टीने स्वागत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोविड रुग्णालयात रुग्णांची सेवा करून व स्वतः क्वारंटाइन राहिल्यानंतर गुरुवारी सुटी मिळालेल्या परिचारिका सुनीती सुशील हरणे यांचे स्थानिक रहिवाशांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. गेल्या महिनाभरापासून त्या कोविड रुग्णालयात रुग्णसेवेत होत्या. 

अवश्य वाचा-  हो... हो... तुम्हाला पाहिजे तो ब्रॅण्ड तासाभरात मिळून जाईल, मात्र...

गणेश विहार क्रमांक दोन येथील रहिवासी असलेल्या सुनीती हरणे यांची कोविड वॉर्डात नियुक्ती करण्यात आली होती. सलग पंधरा दिवस त्यांनी या वॉर्डात दाखल कोरोना संक्रमित रुग्णांना उपचार देण्यासोबत समुपदेशन व मार्गदर्शन करीत सेवा दिली. संक्रमित रुग्णांच्या संपर्कात त्या सातत्याने राहिल्याने त्यांनाही चौदा दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. हा कालावधी गुरुवारी (ता. सात) संपला. त्यांना सुटी देण्यात आली. गुरुवारी सकाळी त्या घरी परतल्या. गणेश विहार क्रमांक दोनमधील रहिवाशांनी नगरसेवक तुषार भारतीय यांच्या आवाहनाहून त्यांच्या सेवेचे कौतुक करीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. त्यांना चार वर्षांची मुलगी व अकरा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या सेवेच्या काळात ही दोन्ही चिमुकले घरी वडील व आजी-आजोबांच्या सोबत होते. 

अजूनही गांभीर्य कळले नाही 

कोरोनावर अजूनही लस आलेली नाही. त्यामुळे सुरक्षितता हाच केवळ औषधोपचार आहे. आज घरी परतत असताना रस्त्यावर शेकडो नागरिकांना बघून या गंभीर आजाराचे गांभीर्य लोकांना कळले नाही, याचे वाईट वाटल्याची खंत सुनीती हरणे यांनी व्यक्त केली. आवश्‍यक काम असेल तरच नियम पाळत घराबाहेर पडा, असे आवाहन त्यांनी केले. 
 

loading image
go to top