भिडेंच्या 'आंब्या'चा सोशल मीडियावर "रस'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

अकोला - 'आम्रसेवने जर होती पुत्र-पुत्री तर मग का करणे लागे पती?' एका उचापतीने सोशल मीडियावर संभाजी भिडे यांच्या "आंब्या'वर दिलेले हे उत्तर आहे. भिडेंच्या "आंब्या'चा कालपासून सोशल मीडियावर चांगलाच "रस' पिळला जात आहे.

अशी म्हण आहे, की साठी बुद्धी नाठी... होय, आंबा खाऊन पुत्र-पुत्री होतेय, असे म्हणाऱ्या संभाजी भिडे आजोबांनी त्याचा प्रत्यय दिला.

नेटकऱ्यांकडून सत्तरी ओलांडलेल्या भिडेंच्या वक्तव्याची खिल्ली उडविली जातेय. म्हणे भिडेचा आंबा पिकलाय... अशा उपरोधिक कविता व्हायलर होतायेत. "आंबा' आणि "आम आदमी' अशी जोडीही नेटकऱ्यांनी जोडून टाकली. काहींनी तर संभाजी भिडे यांचे सोशल मीडियावर नामांतर करून "अंबाजी भिडे' असे नाव केले. नेटकऱ्यांनी भिडेंच्या आंब्यावरून अनेक विनोदही व्हायरल केले आहेत. असे विनोद सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांना थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान दिले. अंनिसनेही भिडे गुरुजींना आव्हान दिल्याच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

Web Title: sambhaji bhide mango social media