

Pune-Nagpur Bus Meets Major Accident in Buldhana
Esakal
समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झालाय. यात २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ११ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. मेहकरजवळ हा अपघात झाला आहे. खासगी बसचा चुराडा झाल्यानं अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.