The Burning Truck : समृद्धी महामार्गावर 'द बर्निंग ट्रक'चा थरार, चालक व क्लिनर गंभीर जखमी

हायड्रोजन मोनॉक्साईड हे केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने समोरील उभ्या ट्रकला धडक दिल्याने ट्रकने पेट घेऊन ट्रक जळून खाक.
The Burning Truck
The Burning Trucksakal

कारंजा - हायड्रोजन मोनॉक्साईड हे केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने समोरील उभ्या ट्रकला धडक दिल्याने ट्रकने पेट घेऊन ट्रक जळून खाक झाल्याची आणि चालक व क्लिनर गंभीर जखमी झाल्याची घटना ११ मार्चला सकाळी साडे ५ वाजता समृद्धी महामार्गावरील लोकेशन १७५ म्हणजेच कारंजा तालुक्यातील दोनद या गावाजवळ घडली.

बक्षीरसिंग (वय-२५ वर्ष) व सरजीत बशीर (वय-२५ वर्ष) अशी जखमींची नावे असून ते दोघेही पंजाब मधील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पि .बी.४६ डब्लू १७३८ क्रमांकाचा ट्रक औरंगाबादहून नागपूर येथे हायड्रोजन केमिकल घेऊन जात असताना मार्गातील अपघात स्थळी समोरील उभ्या ट्रकला धडक बसली, त्यामुळे दोन वाहनांमध्ये घर्षण होऊन हायड्रोजन मोमॉक्साईड केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला.

या घटनेत चालक व क्लिनर असे दोन जण जखमी झाले. जखमींना समृद्धी महामार्ग १०८ चे डॉ. भास्कर राठोड व आतिश चव्हाण यांनी प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी दरम्यान त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले तर दुसऱ्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान घटनेची माहिती कारंजा न. प. च्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता या घटनेत जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com