समुद्रपूर :लालनाला प्रकल्प 98 टक्के भरला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

गिरड (जि. वर्धा) : समुद्रपूर तालुक्‍यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने लालनाला व पोथरा हे दोन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. दोन्ही प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

संततधार पावसाने समुद्रपूर तालुक्‍यातील लालनाला प्रकल्प 98 टक्के भरल्याने खबरदारी म्हणून सकाळी आठ वाजेपासून येथील पाच दरवाजे 27 सेंटिमीटरने उघडले आहेत. त्यामुळे 5100 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या वेळी प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पोथरा प्रकल्प शंभर टक्के भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील मंगरूळ, कोरा, आसोला गावाला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लालनाला प्रकल्पाच्या पाण्याच्या विर्सगामुळे चिमूर-हिंगणघाट मार्गावरील कोरा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पाण्याच्या विसर्गामुळे अनेक शेतातील पीक पाण्याखाली गेले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samudrapur: Lallanala project was 98 percent full