esakal | भंडारा जिल्ह्यात ७९ केंद्रात धान खरेदी सुरू; धान निघाल्याने शेतकऱ्यांना विक्रीची लगबग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात हलके धान कापणीचे काम सुरू झाले आहे. धानखरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्यास खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याची मालाची खरेदी करून त्यांची लुबाडणूक केली जाते. त्यामुळे गेल्या शुक्रवारीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लगेच जिल्ह्यातील हमीभाव धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले.

भंडारा जिल्ह्यात ७९ केंद्रात धान खरेदी सुरू; धान निघाल्याने शेतकऱ्यांना विक्रीची लगबग

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक टाळणे व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी धानविक्री करता यावी, यादृष्टीने जिल्ह्यात यावर्षी हमीभाव धानखरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी भंडारा यांनी ७९ हमीभाव धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिल्यावर जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थांना त्वरित धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारपासून खरेदी केंद्र सुरू झाले आहेत.

हलक्या धानाची कापणी सुरू

ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात हलके धान कापणीचे काम सुरू झाले आहे. शेतकरी शेतातून धानाची ने-आण करण्याची बचत करण्यासाठी सरळ खरेदी केंद्रात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, धानखरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्यास खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याची मालाची खरेदी करून त्यांची लुबाडणूक केली जाते. त्यामुळे गेल्या शुक्रवारीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लगेच जिल्ह्यातील हमीभाव धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

अवश्य वाचा : आई जेवनाचा डबा घेऊन घरी आली; मात्र, मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघून फोडला हंबरडा

दिवाळीच्या आधीच होणार मालाची विक्री

त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी २०२०-२१ मध्ये धानखरेदीसाठी जिल्ह्यातील ७९ केंद्रांना मंजुरी प्रदान केली आहे. त्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी सर्व सब एजंट संस्थांना ३१ ऑक्‍टोबरपूर्वी धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे दिवाळी सणाच्या आधीच शेतकऱ्यांना मालाची विक्री करणे शक्‍य झाले आहे.

या ठिकाणी होणार खरेदी

भंडारा तालुक्‍यात वाकेश्‍वर, आमगाव, बेलगाव, बेला, पिपरी. तुमसर तालुक्‍यात माडगी, खापा, आंबागड, येरली, चुल्हाड, वाहनी, सिहोरा, बपेरा, हरदोली, गर्रा, बघेडा, चिचोली आणि नाकाडोंगरी येथे खरेदी केंद्र आहेत. साकोली तालुक्‍यात एकोडी, परसोडी, सातलवाडा, साकोली, विरसी, सानगडी, वडद, निलागोंदी, सुकळी, सावरबंध, पळसगाव, गोंडउमरी. लाखनी तालुक्‍यात मुरमाडी तुप., जेवनाळा, मेंगापूर, देवरी, लाखोरी, लाखनी, सालेभाटा. लाखांदूर तालुक्‍यात पुयार, लाखांदूर, बारव्हा, कुडेगाव, मासळ, विरली बुज, पारडी. पवनी तालुक्‍यात आसगाव, अड्याळ, पवनी, चकारा, कोदुर्ली, कोंढा, वाही, चिचाळ या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हमीभाव धानखरेदी केंद्र सुरू केले आहेत.

जाणून घ्या : काँग्रेसच नाही तर आघाडी सरकार शेतकरी विधेयकाच्या विरोधात ; का म्हणाव लागल प्रदेशाध्यक्षांना असं

एकूण केंद्रांची माहिती मिळेल
मंजूर करण्यात आलेले धानखरेदी केंद्र लगेच सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारपासून खरेदी केंद्र सुरू होत आहेत. सोमवारपासून जिल्ह्यातील एकूण केंद्रांची माहिती मिळू शकेल.
-गणेश खर्चे
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image