इसापूर धरण परिसरात अभयारण्य!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

संतोष मुडे
उमरखेड (जि. यवतमाळ) : पैनगंगा नदीवर बांधलेल्या इसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाने फिरविला. आता या ठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल व वनविभाग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार येथे वन्यजीवांचे संरक्षण व त्यांची पैदास करण्यात येणार आहे.

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. पुसद तालुक्‍यातील इसापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे मोठे धरण बांधले आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात विविध दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. म्हणून येथे पक्षी अभयारण्य निर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या समोर होता. वन व महसूल विभागाने संयुक्त पाहणी केली. अहवालही पाठविला होता. मात्र, या परिसरात पक्ष्यांची संख्या कमी झाल्याने आता या ठिकाणी वन्यजीव अभयारण्य म्हणून हा परिसर विकसित करण्याचा नव्याने निर्णय घेण्यात आला आहे. हे अभयारण्य 37.80 चौरस किलोमीटर परिसरात राहणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanctuary in Isapur dam area!