esakal | वाळूच्या टिप्परचे नियंत्रण सुटले अन् घडली ही घटना...
sakal

बोलून बातमी शोधा

दिग्रस (जि. यवतमाळ): अपघातात उलटलेला टिप्पर.

चालक मनोहर नत्थुजी होलगरे (वय 42, रा. सिंगद) हा वाळूने भरलेला टिप्पर चालवत असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टिप्पर रस्त्याच्या खाली उतरून उलटला. या टिप्परमध्ये असलेले चार कामगार वाळूखाली दबले गेल्यांने त्यांचा मृत्यू झाला.

वाळूच्या टिप्परचे नियंत्रण सुटले अन् घडली ही घटना...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : घाटंजी तालुक्‍यातील शिवर घाटातून वाळूने भरलेला ट्रक दिग्रसकडे येताना आर्णी-दिग्रस रस्त्यावरील लाख फाट्याजवळ उलटला. या भीषण अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात शनिवारी (ता. 21 मार्च) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. वाळूतस्करीत हा टिप्पर वापरला जात असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

चार कामगार वाळूखाली दबले

चालक मनोहर नत्थुजी होलगरे (वय 42, रा. सिंगद) हा वाळूने भरलेला टिप्पर चालवत असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टिप्पर रस्त्याच्या खाली उतरून उलटला. या टिप्परमध्ये असलेले चार कामगार वाळूखाली दबले गेल्यांने त्यांचा मृत्यू झाला. यात सहदेव महादेव भोरकडे (वय 28), अविनाश लहू कांबळे (23), लखन पांडुरंग खटारे (25, सर्व रा. सिंगद, ता. दिग्रस), अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी गणेश नारायण होलगरे (32) यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

दोघे किरकोळ जखमी

टिप्परच्या कॅबिनमध्ये बसलेले वाहनचालक मनोहर नत्थुजी होलगरे (42) व गणेश प्रकाश सातपुते (20, सर्व रा. सिंगद) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना यवतमाळ येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक सोनाजी आमले यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली.

मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी टिप्परचालक मनोहर होलगरे व मालक अजय विठ्ठल भोयर (रा. विराजनगर, दिग्रस) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत कडू, केशव चव्हाण व हनुमंता बोरकर करीत आहेत.

असे काय घडले? : मैत्रिणीचा बापच झाला हैवान, शाळेत जाताना साधली संधी मग..

वाळूतस्करांवर कारवाई करणार
सध्या "कोरोना' विरोधातील उपाययोजनेत तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. ते पाहून वाळूतस्करांनी त्यांच्या कारवाया सुरू केल्या आहेत. आता वाळूतस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- राजेश वजीरे, तहसीलदार, दिग्रस.

loading image