वाळू तस्करीचे गुन्हे थांबता थांबेनात! 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

हिंगणी येथील पैनगंगा नदीपात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्या अकरा जणांना अटक करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने गुरुवारी (ता.30) पहाटे ही कारवाई केली. यावेळी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महागाव (जि. यवतमाळ)  : प्रशासनाचे कठोर नियम आणि निगराणी  असली तरी वाळू तस्करीच्या घटना थांबण्याचे  नाव घेत नाहीत. कोरोनाच्या संकटात, संचारबंदीतही वाळू तस्करी सुरूच आहे.
हिंगणी येथील पैनगंगा नदीपात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्या अकरा जणांना अटक करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने गुरुवारी (ता.30) पहाटे ही कारवाई केली. यावेळी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हिंगणी वाळू घाटावरून फुलसावंगी येथे लोक ट्रॅक्‍टरद्वारे वाहतूक करतात. ट्रॅक्‍टरमालक रस्त्यात काही अडथळा आहे का, हे पाहण्यासाठी दुचाकीने येऊन खातरजमा करतात. काळी टेंभी परिसरात असलेल्या नदीच्या काठावर सापळा रचण्यात आला.

सविस्तर वाचा - विदर्भवाद्यांनी केले आंदोलन स्थगित...हे आहे कारण

यावेळी सोहिलोद्दिन शब्बीरोद्दिन नवाब (वय 24, रा. फुलसावंगी), बालाजी खोकले (वय 25, रा. वडद), नवनाथ मुरमुरे (वय 22, रा. वडद), बाळू मेंढे (वय 20), अमोल लव्हाळे (वय 21), शंकर कोमेवाड (वय 21, सर्व रा. वडद), शेख सादिक शेख रहीम (वय 25), विशाल चप्पलवार (वय 25), सुनील वाघमारे (वय 30), संतोष मसाळ (वय 38), अविनाश वारंगे (वय 23, सर्व रा. फुलसावंगी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. चोरटी वाहतूक ही करम खान सादत खान (रा. फुलसावंगी), सोहिलोद्दिन नवार, शेख इरफान शेख निजाम (रा. फुलसावंगी) यांच्यासाठी करीत असल्याचे चौकशीत समोर आले. यावेळी तीन ट्रॅक्‍टर, एक ट्रॉली, दुचाकी, वाळू असा एकूण 19 लाख 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकराही जणांविरुद्ध महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand smuggling soars new levels