अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : अनिल बोंडे पक्षासाठी प्रयत्न करणार, की बहिणीला दिलेला आशीर्वाद पाळणार?

टीम ई सकाळ
Wednesday, 11 November 2020

वडील व भावाचे पाय धुवून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बहीण भावाचे अतूट प्रेम दिसून आले. एकीकडे पक्ष, तर दुसरीकडे बहीण, असा पेच अनिल बोंडे यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

अमरावती - अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. संगीता या भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी बहीण-भावाला अश्रू अनावर झाले. त्यामुळे आता बोंडे पक्षाच्या उमेदवारासाठी प्रयत्न करणार, की बहिणीला दिलेला आशीर्वाद पाळणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा - खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १८ हजार कोटींची मदत

वडील व भावाचे पाय धुवून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बहीण भावाचे अतूट प्रेम दिसून आले. एकीकडे पक्ष, तर दुसरीकडे बहीण, असा पेच अनिल बोंडे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मात्र, मी पक्षासाठी काम करेल. भाऊ म्हणून तिला पण आशीर्वाद दिला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अनिल बोंडे त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - देहव्यापारातील आरोपींनी सांगितले खोटे नाव अन् खऱ्या चोखांद्रेंची उडाली झोप

निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून 1 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपकडून नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शिक्षक महासंघाकडून शेखर भोयर  निवडणूक लढवित आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नासाठी शेखर भोयर सातत्याने काम करताना दिसत आहेत. श्रीकांत देशपांडे यांच्याबद्दल मात्र शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर त्यांच्या कार्यकाळात दिसून आला. या निवडणुकीत भाजपकडून नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संगीता शिंदेसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशमुख, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangita shinde takes blessing from her brother anil bonde for amravati teacher constituency election