Sangrampur News : ज्वारीचे बोगस बियाणे देवून कृषी विभागाकडून फसवणुक; 'तो मी नव्हेच'ची कृषी विभागाची भूमिका

टूनकी च्या शेतकऱ्याने दिला 'आत्मदहन'चा इशारा.
Farmer Atul Bedarkar
Farmer Atul Bedarkarsakal

संग्रामपूर - तालुक्यातील दुनकी खुर्द, येथील शेतकऱ्याने संग्रामपूर कृषी विभागातून घेतलेले ज्वारीचे बियाणे पिका योग्य निघाले नाही. नुकसान भरपाई मिळाली नाही तर मतदानाचे दिवशी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करणार. असा इशारा अतुल बेदरकार यांनी पोलिसात दिलेल्या निवेदनातून दिला आहे. बेदरकार यांची गोपाळखेड शिवारात 1.10 हे. आर शेती आहे.

त्यांनी रब्बी हंगामसाठी कृषी विभाग संग्रामपूर, कडुन महामंडळचे फुले सुचित्रा नावाचे ज्वारीचे बियाणे घेतले होते. त्या ज्वारी पिकासाठी खुप मेहनत घेऊन योग्य सिंचन खते टाकली. मात्र ते ज्वारी ची खुप उंच वाढ झाली असुन हवेमुळे कोळमडून पडत आहे. त्याला कणुस पण खुपच लहान आहे.

इतर शेतक-यांनी दुसरे बियाणे लागवड केली. त्याला चांगले कणूस पडले, असुन त्यांची वाढ कमी झाली त्यामुळे एकही ज्वारीचे झाड खाली पडले नाही, कृषी विभागाने हवामानावर आधारित शिफारशीनुसार प्रमाणित बियाणे वाटप करायला हवे होते. परंतु तसे न करता त्यानी जे बियाणे शेतक-याच्या माथी मारले ते पुर्णतः निकामी ठरले. याची कृषी विभागाने चौकशी करून न्याय दयावा.

सोबतच निवेदन दिल्या पासून सात दिवसात माझे शेतामध्ये कृषी तज्ञ लोकांना बोलावून अहवाल तयार कराया, आणि मजा नुकसान भरपाई दयावी. मी 3 महिने उन्हातानात पिकाला पाणी देल 1700 रु किमंतीच खत टाकल 300 रू. रोजनदारीने निदन केल, डरवणी 500रु एक्कर 1000 रु एक्करची फवारणी रात्र दिवस एक करून मेहनत केली. पण त्या महामंडळचे बोगस ज्वारीचे फुले सुचित्रा बोटभर कणुस 17 फुट उंच झाड अस पिक कधी पाहल नाही.

कृषी विभागाने हवामानावर आधारित शिफारशीनुसार प्रमाणित बियाणे वाटप करायला हवे होते. परंतु तसे न करता त्यानी जे बियाने चालत नाही ते बियाणे शेतक-याच्या माथी मारले. यात माझे व माझे सारखे अन्य शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी. अन्यथा मी लोकशाहीच्या उत्सव निवणुकीच्या दिवशी कृषी कार्यालय संग्रामपूर समोर अंगावर पेट्रोल घेवून किंवा माझे शेतातील कडु निंदाच्या झाडाला फाशी घेवून आत्महत्या/आत्मदहन करणार आहे. माझ्या जिवाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्वशी जबाबदार प्रशासन, शासन संबंधीत कार्याललय जबादार राहील. असे अतुल बेदरकार यांनी प्रशासनाकडे लेखी दिले आहे.

ते ज्वारीचे बियाणे आम्ही दिलेच नाही...

महाबीजकडून प्रकल्प असलेल्या गावासाठी बियाणे देण्यात येते. टूनकी येथील शेतकऱ्याने ज्या बियाणेची तक्रार दिली ते ज्वारीचे बियाणे आमचे नसून मी दिलेले नाही. असे तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यानी सकाळ प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

त्या बियाण्याचे लॉट ची तपासणी करा..

कृषी अधिकारी म्हणतात की, आम्ही बियाणे दिले नाही तर मग आमचेकडे असलेल्या बियाण्याच्या खाली बॅग व त्यावरील लॉट याची तपासणी होणे गरजेचे आहे. सोबतच सदर तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयातून बॅग दिल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पण दिसून येईल. असे तक्रार कर्त्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com