अकोल्यातही आता सॅनिटायझिंग टनल

मनोज भिवगडे
Tuesday, 14 April 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लढणाऱ्या महायोद्धांमध्ये अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भारत एक कदमचे अरविंद देठे यांचेही नाव घ्यावे लागले. त्यांनी या विषाणूशी लढा देणाऱ्या डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकोल्यात सॅनिटायझिंग टनल उपलब्ध करून दिले आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लढणाऱ्या महायोद्धांमध्ये अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भारत एक कदमचे अरविंद देठे यांचेही नाव घ्यावे लागले. त्यांनी या विषाणूशी लढा देणाऱ्या डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकोल्यात सॅनिटायझिंग टनल उपलब्ध करून दिले आहे.

 

चीन, दक्षिण कोरिया या सारख्या देशांनी कोरोनाविरुद्ध लढताना डॉक्टरांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले. त्यामुळे येथे वैद्यकीय सेवा योग्यप्रकारे पुरविता आल्यात. नागरिकांना निर्जंतुकिकरण करण्यासाठी जागोजागी सॅनिटाझिंग टनल या देशांनी वापरले. त्याच प्रमाणे भारतातीही या उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहे. मात्र भारतासारख्या देशापुढे संसाधनांचा मोठा प्रश्‍न असतो. यावर मात करीत बाळापूर तालुक्यातील अंत्री या छोट्याशा गावातून पुढे आलेले अरविंद देठे यांनी आर. के. टेक्नॉलिजने त्यावर कोरोना सॅनटायझिंग टनल तयार केले आहे. यापूर्वी त्यांना रेडिमेट शौचालय बनवून स्वच्छ भारत मिशनमध्ये मोठे योगदान दिले आहे.

 

येथे डॉक्टर सुरक्षित
कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या गळ्यातील स्वॅब घेणारे डॉक्टरांनाच संसर्ग होतो आहे. त्यामुळे डॉक्टर सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेवून देठे यांनी सॅम्पल घेण्यासाठी सॅनटायझिंग टनल तयार केले आहे. ते मागणीनुसार खासगी व शासकीय रुग्णालयांना त्याचा पुरवठा करणार आहेत.

 

स्प्रे टनल
डॉक्टरांसोबत पॅरामेडिकल स्टॉपही कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न लक्षात घेवून ऑटोमेटिक सेंसरने काम करणारे स्प्रे टनल ही त्यांनी तयार केला आहे. या टनलमध्ये व्यक्ती केल्यानंतर आपोआप स्प्रे सुरू होईल. हा स्प्रे 15 सेकंदानंतर आपोआप बंद होतो. हा स्प्रे टनल रुग्णालय, मॉल, बाजार, शाळा-महाविद्याल, सरकारी व खासगी कार्यालयांसोबतच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना निर्जंतुकिकरण करण्यासाठी उपयुक्त आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanitizing tunnel now in Akola