संजय दत्तने घेतले गडकरींकडे जेवण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर ः अभिनेता संजय दत्तने आज रात्री केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांना जेवणाला आमंत्रित केले. दोघांनीही जेवण करीत विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजते.

नागपूर ः अभिनेता संजय दत्तने आज रात्री केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांना जेवणाला आमंत्रित केले. दोघांनीही जेवण करीत विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजते.
अभिनेता संजय दत्त आज रात्री अचानक मुंबईवरून नागपूरला आला. त्याने नागपुरातील मित्र संजय दुबे यांच्यासह थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रामनगर येथील भक्ती निवासस्थानी धाव घेतली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संजय दत्तचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगेच संजय दत्तला जेवणाचे आमंत्रण दिले. दत्त आणि गडकरी यांनी सोबत जेवण केले. संजय दत्त गडकरी यांच्याकडे तासभर होते. यावेळी केवळ कौटुंबिक चर्चा झाल्याचे संजय दत्त यांचे मित्र संजय दुबे यांनी सांगितले. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. संजय दत्त यांच्यासोबत गडकरी यांचे कौटुंबिक संबंध असल्याने त्यांनी सदिच्छा भेट दिल्याचेही दुबे यांनी नमूद केले. रात्री साडेअकराच्या सुमारास संजय दत्त मुंबईकडे रवाना झाला. घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार केल्याशिवाय गडकरी त्यांना परत पाठवीत नाही. अनेकदा त्यांनीही आपल्या भाषणातून जाहीरपणे सांगितले. यापूर्वीही सलमान खान, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, हेमामालिनी आदींनी गडकरींकडे जेवण केले. संजय दत्तच्या अचानक भेट घेऊन परत जाण्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dutt has lunch with Gadkari