ज्येष्ठ नेपथ्यकार संजय काशिकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

नागपूर: नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी आणि विदर्भातील आघाडीचे नेपथ्यकार संजय काशिकर यांचे आज (सोमवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.

तीन दशकांपेक्षा अधिक काळ रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणाऱ्या या कलावंताची अचानक एक्‍झीट सर्वांना चटका लावून गेली. दोन आठवड्यांपूर्वी सोनेगाव येथील त्यांच्या निवासस्थानावरून ते एका कामासाठी बाहेर पडले. खामला चौकात त्यांचा अपघात झाला. शरीरावर फारशा जखमा नसल्या तरी मेंदूला आतून जबर मार बसला होता. त्यांना तातडीने ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर मेंदूवरील उपचारासाठी धंतोली येथील न्युरॉन हॉस्पीटलमध्ये त्यांना हलविण्यात आले. गेले दहा दिवस डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र, आज पहाटेपासून त्यांची प्रकृती खालावली आणि साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: sanjay kashikar passes away