

Yavatmal Minister Sanjay Rathod Sets Protocol Aside Meets Tribal Families And Reviews Their Problems And Development Needs
esakal
यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी बाभुळगाव तालुक्यातील पिंपरी ईजारा येथील इंदिरानगर कोलाम पोडावर जाऊन आदिवासी बांधवांसोबत संपूर्ण दिवस घालविला. शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून गावकर्यांसोबत जमिनीवर बसत संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पारंपरिक नृत्यातही सहभाग घेतला.