महिलांनो! यंदा वाणाचे ट्रेंड बदलले, हळदी-कुंकू लावताना स्पर्श टाळण्यासाठी हटके ट्रिक्स

प्रभाकर कोळसे
Saturday, 16 January 2021

संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन महिला करतात. यानिमिताने एकमेकींना वाण देण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे.

नंदोरी (जि.वर्धा) : संक्रांतीच्या वाणासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वस्तूचा ट्रेंड बदलला आहे. यंदा पारंपरिक वस्तू सोबत डिझायनर मास्क, सॅनिटाइझर व कापडी पिशव्या वाणाच्या स्वरुपात हळदी-कुंकवासाठी आलेल्या महिलांना दिले जात आहे.

हेही वाचा - 'त्या' रात्री १० नाही ११ जीव गेलेत; भंडारा आग प्रकरणात मोठा ट्विस्ट; खळबळजनक आरोप

संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन महिला करतात. यानिमिताने एकमेकींना वाण देण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. आजपर्यंत वाण देण्यासाठी गृहोपयोगी वस्तूंमध्ये स्टील,प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्या जात होत्या. मात्र, कोरोनाने यात विविध डिझायनर मास्क, सुगंधी सनिटाईझरची भर पाडली आहे. यंदा हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. कोरोनामुळे हळदी कुंकवाचेही पॅकिंगचे प्रकार बाजारात आले आहेत. याच्या आवरणाला लहान मनी, लहान आरसे, टिकल्यांची सजावट करून आकर्षक रूपही दिले गेले आहे. पॅकिंग हळदी कुंकू यामुळे एकमेकींना हाताचा स्पर्श टाळला जाणार आहे. यामुळे पॅक हळदी कुंकवाला पसंती दिली जात आहे. 10 ते 50 रुपये पर्यंत याची विक्री केली जात आहे. एक मात्र खरे यंदा कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर वाणांचा ट्रेडही बदलला आहे. वाणात डिझायनर मास्कचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - तिनं बोलवलं अन् नातेवाईकांनी चोपलं; विवाहितेशी चॅटिंग आलं युवकाच्या अंगाशी 

पॅकिंग हळदी-कुंकवाचा समावेश -
यंदाच्या संक्रांतीला महिलांनी कोरोना संसर्गापासून सावधगिरी म्हणून पॅकिंगच्या हळदी-कुंकवाचा वापर केल्याचे दिसून आले आहे. यात महिलांककडून घरी वाणाला आलेल्या महिलेलेला प्लॅस्टिकच्या थैलीतील हळदी-कुंकू देत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या या संसर्गाच्या भीतीमुळे संक्रांतीच्या हळदी-कुंकवाची पद्धतही बदलल्याचे दिसून आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sankrat festival changes due to corona in wardha