'विहिंप'सह संतांची केंद्र सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी देशात "अच्छे दिन' आल्याची हाकाटी पिटली तरी देशातील संतांना मात्र त्याची अनुभूती आलेली नाही. विश्‍व हिंदू परिषदे (विहिंप)च्या राष्ट्रीय अधिवेशनात संतांनी केंद्र सरकारने टीकास्त्र सोडले. 

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी देशात "अच्छे दिन' आल्याची हाकाटी पिटली तरी देशातील संतांना मात्र त्याची अनुभूती आलेली नाही. विश्‍व हिंदू परिषदे (विहिंप)च्या राष्ट्रीय अधिवेशनात संतांनी केंद्र सरकारने टीकास्त्र सोडले. 

विश्‍व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. या अधिवेशनासाठी विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्यासह देशातील अनेक संत उपस्थित आहेत. राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात रामकथाकार गोविंदगिरी महाराज यांनी "अच्छे दिन' कुठे आहे?, असा प्रश्‍न करून केंद्र सरकारला घरचा अहेर दिला. गेल्या अडीच वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे; परंतु संतांना अच्छे दिन आल्याचा अनुभव आला नाही. या उलट संतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सुनावले. 

मोदी सरकारवर टीका करणाऱ्या संतांना किंवा डॉ. तोगडिया यांच्या वक्तव्याचा कुणीही विरोध केला नाही. सर्व संतांची या वक्तव्यांना मूक संमती होती, असेच चित्र या मेळाव्यात दिसून येत होते. 

राम मंदिरासाठी पुढील वर्षी आंदोलन 
डॉ. तोगडिया यांनीही केंद्र सरकारवर आसूड ओढले. अयोध्येत राम मंदिराचा मुद्याचा राग त्यांनी आळवला. राम मंदिर बांधण्यासाठी केंद्र सरकारला कुणी रोखले आहे? असा सवाल त्यांनी केला. राम मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात केंद्र सरकारने निश्‍चित कालावधी जाहीर करावा. अन्यथा पुढील वर्षापासून राम मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात विहिंप देशव्यापी आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला. डॉ. तोगडिया यांनी 370 कलम व गोहत्या बंदीचा मुद्दाही येथे उगाळला.

Web Title: sant comment on central government