संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने केलेली पदभरती नियमबाह्यच

Akola
Akola

अकाेला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने २५ अाॅगस्ट २०१६ च्या जाहिरातीद्वारे केलेली अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांची पदभरती नियमबाह्यच असल्याचा खुलासा उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केला. हा खुलासा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर सचिव विजय साबळे यांना १ नाव्हेंबर २०१७ ला सादरही केला.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर सचिव विजय साबळे यांनी संत गाडगेबाबा अमपावती विद्यापाठाने केलेल्या पदभरतीबाबत उच्च शिक्षण संचालकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अादेश दिले अाहेत का याबाबत २४ अाॅक्टाेबर २०१७ ला खुलासा सादर करण्यास सांगितले हाेते. विशेष म्हणजे अवर सचिवांनी २४ अाॅक्टाबरलाच या पदभरतीस कार्याेत्तर मान्यताही प्रदान केली हाेती. या प्रकरणात कुलगुरू अाणि कुलसचिवांनाही खुलासा मागविण्यात अाला हाेता मात्र पदभरतीस कार्याेत्तर मान्यता मिळाली असल्याने या प्रकरणाचा खुलासा विद्यापीठाने करण्याचे टाळले.  उच्च शिक्षण संचालकांनी मात्र अापली बाजू स्पष्ट केली.

२ जुन २०१५ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरळ सेवेच्या काेट्यातील रिक्त असणाऱ्या पदांपैकी ५० टक्के किंवा एकूण संवर्गाच्या ४ टक्के यापैकी जे कमी असेल इतकीच पदे भरण्यात यावी असे अादेश देण्यात अाले हाेते. तसेच शिक्षकीय पदांना मात्र ७५ टक्के पदे भरण्यास मुभा देण्यात अाली हाेती. असे असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने भरती प्रक्रियेबाबत केलेली कारवाई ही शिक्षकेत्तर पदे अापल्या साेईनुसार भरून शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावण्यात अाला असे  डॉ. धनराज माने यांनी स्पष्ट केले अाहे. २ जून २०१५ चा शासन निर्णय असताना यापेक्षा वेगळे निर्देश विद्यापीठाला देण्याच प्रश्‍नच येत नाही. शासन निर्णयाच्या विपरित कुठलेही निर्देश कुलगुरूंना देण्यात अाले नाही. नियमबाह्य भरतीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अादेश देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण डॉ. धनराज माने यांनी अवर सचिव विजय साबळे यांना लेखी स्परूपात सादर केले अाहे.

उपकुलसचिवांना दिले निर्देश
‘नवीन विद्यापीठ कायदा लवकर येत असून सध्या अधिकार मंडळे अस्तित्वात नसल्याने नवीन कायदा येईपर्यंत विद्यापीठांनी भरती प्रक्रीया राबवू नये’. असे निर्देश १६ जानेवारी २०१६ राेजी पुणे येथे अायाेजित उपकुलसचिवांच्या बैठकीत मी  दिले हाेते असेही डॉ. माने यांनी खुलाशात म्हटले अाहे.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com